By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 11:21 IST
1 / 9टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. आपल्या स्टायलिश लुकने ती सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.2 / 9सोमवारी अंकिताने तिच्या घरी हॅलोवीन पार्टी आयोजित केली होती. यावेळी अंकिताचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.3 / 9हॅलोवीन पार्टी लुकचे काही फोटो अंकिताने शेअर केले आहेत. या फोटोत अंकिता व्हाईट-गोल्ड ऑफ शोल्डर गाऊनमध्ये दिसतेय.4 / 9आत्तापर्यंत सर्वात बेस्ट लुक, मला आवडला, असं लिहित अंकिताने इन्स्टाग्रामवर या लुकचे फोटो शेअर केले आहेत.5 / 9काहींना अंकिताचा हा लुक जाम आवडला. पण अनेकांनी अंकिताला या अवतारात पाहून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.6 / 9साडीत छान दिसतेस, यात बकवास दिसत आहेत. प्लीज पुन्हा असं काही ट्राय करू नकोस, अशा कमेंट्स चाहत्यांनी दिल्या.7 / 9नुकतीच अंकिताने लग्नानंतरची पहिली दिवाळी ती साजरी केली. यावेळी अंकिताने सासरच्या घरच्या दिवाळी सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ शेअर केला होता.8 / 9अंकिताच्या सासरचं घर म्हणजे जणू महाल आहे. हे घर इतकं अलिशान आहे की, त्यापुढे सलमान, शाहरूखचं घरही फिकं वाटावं. अंकिताच्या या घराची चांगलीच चर्चा रंगली होती.9 / 9अंकिता व विकी जैन यांनी गतवर्षी 14 डिसेंबरला लग्नगाठ बांधली होती. या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. अंकिताचा पती विकी हा मोठा बिझनेस मॅन आहे. अगदी प्रत्येक सेक्टरमध्ये त्याचा बिझनेस आहे.