Join us

गुड्डू रंगीलाची टीम लोकमतमध्ये

By admin | Updated: July 2, 2015 00:00 IST

गुड्डू रंगीला या सिनेमामध्ये मनानं चांगली परंतु खट्याळ असलेली मुलं इझी मनीसाठी जे साहस करतात त्याची मजा बघायला मिळणार ...

गुड्डू रंगीला या सिनेमामध्ये मनानं चांगली परंतु खट्याळ असलेली मुलं इझी मनीसाठी जे साहस करतात त्याची मजा बघायला मिळणार असून संदेश असलेला हा सिनेमा मनोरंजनही करेल असा विश्वास तिघांनीही व्यक्त केला.

फिल्म इन्स्टिट्युटसारख्या संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नसावा आणि निव्वळ गुणवत्तेच्या आधारावरच पदाधिका-यांच्या नेमणुका व्हाव्यात अशी अपेक्षा अदिती राव हैदरीने व्यक्त केली.

एखादा चित्रपट हिट झाला की प्रोड्युसर्स त्याच धाटणीच्या भूमिका घेऊन येतात आणि मग त्या इमेजमधून बाहेर पडणं कठीण होऊन बसतं अशी कबुली अर्षदने दिली.

कायपोचे मुळे लोकांच्या स्मरणात असलेल्या अमित साधने लाइफचा मजा घेत काम करायला मिळतं असं सांगत करीअरबाबत समाधानी असल्याचं सांगितलं.

संजय दत्त शिक्षा भोगून परत येईल त्यावेळी मुन्नाभाईचा तिसरा भाग येईल आणि तोही तुफान चालेल असा विश्वास अर्षदला आहे.

सुभाष कपूरच्या गुडड् रंगीला या येऊ घातलेल्या बॉलीवूडमधल्या सिनेमाचे कलाकार अर्षद वारसी अदिती राव हैदरी आणि अमित साध यांनी लोकमतच्या कार्यालयाला भेट दिली. त्याची एक झलक...