Flashback 2025 : अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, प्राजक्ता गायकवाडसह २०२५ मध्ये हे कलाकार चढले बोहल्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 12:23 IST
1 / 18वर्ष २०२५ हे मनोरंजन विश्वासाठी संमिश्र भावनांचे ठरले. एकीकडे काही दिग्गजांच्या एक्झिटने मन सुन्न झाले, तर दुसरीकडे लग्नसराईच्या धामधुमीत अनेक कलाकारांच्या आयुष्याची नवी इनिंग सुरू झाली. २०२५ मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या मराठी कलाकारांच्या जोड्यांवर टाकूया एक नजर:2 / 18 २१ जानेवारी रोजी 'राजा राणीची गं जोडी' फेम शिवानी सोनार आणि 'रंग माझा वेगळा' फेम अंबर गणपुळेने लग्नाची गाठ बांधली. 3 / 18२५ जानेवारीला 'मन धागा धागा जोडते नवा' फेम अभिनेता अभिषेक रहाळकरने कृतिका कुलकर्णीसोबत गुपचूप लग्न उरकत चाहत्यांना सुखद धक्का दिला.4 / 18१६ फेब्रुवारीला 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरने संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसोबत लग्न केले.5 / 18'लक्ष्मी निवास'मधील जान्हवी म्हणजेच दिव्या पुगावकरनेही १६ फेब्रुवारीला तिचा बॉयफ्रेंड अक्षय घरतसोबत संसार थाटला.6 / 18सोशल मीडिया स्टार प्राजक्ता कोळीने ११ वर्षांच्या डेटिंगनंतर २७ फेब्रुवारीला वृषांक कनालशी लग्न केले.7 / 18'बिग बॉस मराठी ४'चा विजेता अक्षय केळकर ९ मे रोजी त्याची मैत्रीण साधना कातकर हिच्याशी विवाहबंधनात अडकला.8 / 18९ जून रोजी 'पाणी' चित्रपट फेम रुचा वैद्यने यश किरकिरेसोबत लग्न केले.9 / 18२० जून रोजी 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अक्षर कोठारीने त्याच्या बालपणीच्या मैत्रीण सारिका खासनिसशी अत्यंत साधेपणाने लग्न केले.10 / 18तब्बल १२ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर २८ ऑगस्ट रोजी सारंग साठ्ये आणि पॉला या जोडीने कॅनडामध्ये लग्नगाठ बांधली.11 / 18१६ नोव्हेंबर रोजी मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर लग्नबेडीत अडकले. रंग माझा वेगळा मालिकेच्या सेटवर मैत्री झाली आणि मग त्यांच्यात प्रेम फुलले.12 / 18२५ नोव्हेंबर रोजी 'सहकुटुंब सहपरिवार' फेम कोमल कुंभार आणि गोकुळ दशवंतने पुण्यात थाटामाटात लग्न केले.13 / 18२९ नोव्हेंबरला 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता सूरज चव्हाणने त्याची बालपणीची मैत्रीण संजना गोफणे हिच्यासोबत सातफेरे घेतले.14 / 18२ डिसेंबर रोजी प्राजक्ता गायकवाडने उद्योजक शंभुराजशी लग्न करून खुटवड घराण्याची सून म्हणून गृहप्रवेश केला.15 / 18आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम आणि अभिनेत्री पूजा बिरारी २ डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. या लग्नाची चर्चा आजही सोशल मीडियावर सुरू आहे.16 / 18४ डिसेंबरला तेजस्विनी लोणारीने युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी लग्नाची गाठ बांधली.17 / 18५ डिसेंबरला 'हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी क्रिएटिव्ह हेड कोमल भास्करशी लग्न केले.18 / 18'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्तेने ५ डिसेंबर रोजी निर्माता सुमित म्हशीलकरसोबत दुसऱ्यांदा लग्न करत आयुष्याची नवी सुरुवात केली.