By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 15:12 IST
1 / 18बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर नुकतेच विवाह बंधनात अडकले. खंडाळा येथील फार्महाऊसवर अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दोघांनीही लग्न उरकलं.2 / 18या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आता शिबानीने तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.3 / 18मेहंदी सेरेमनीत शिबानी धम्माल मस्ती करताना दिसतेय. फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल.4 / 18मेहंदी सेरेमनीत शिबानीने प्रिंटेड को ऑर्ड सेट घातला होता. यात ती प्रचंड सुंदर दिसत होती.5 / 18मेहंदी सेरेमनीत शिबानीने धम्माल डान्सही केला. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.6 / 18यावेळी फरहानच्या हातावरही शिबानीच्या नावाची मेहंदी सजली. खुद्द शिबानीने त्याच्या हातावर मेहंदी काढली.7 / 18शिबानीने हातभर मेहंदी न काढता केवळ फरहानचं नाव आपल्या हातावर लिहिलं. पण हा क्षण तिने मनापासून जगला.8 / 18शिबानीच्या मेहंदी सेरेमनीत तिची बेस्ट फ्रेन्ड रिया चक्रवर्तीही दिसली. दोघीही मज्जा करताना दिसल्या.9 / 18मेहंदी सेरेमनीत फरहान व शिबानी एकमेकांच्या मिठीत विसावलेले दिसले. या कपलने लग्नातला प्रत्येक क्षण एन्जॉय केला.10 / 18शिबानी आणि फरहान हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांना लग्नाचा निर्णय घेतला आणि अखेर 19 फेब्रुवारी रोजी दोघं विवाह बंधनात अडकले.11 / 18विशेष म्हणजे दोघांनी हिंदु किंवा मुस्लीम पद्धतीनं विवाह न करता लग्नाची वचनं घेत आणि रिंग सेरेमनी करत ते विवाहबद्ध झाले.12 / 18फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांची लव्ह स्टोरी एका रिअॅलिटी शोदरम्यान सुरू झाली होती.13 / 182015 मध्ये ‘आय कॅन डू दॅट’ नावाच्या रिअॅलिटी शोच्या सेटवर त्यांची भेट झाली होती. त्यावेळी फरहान अख्तर विवाहित होता आणि तो शोचा होस्ट होता.14 / 18शिबानी या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यानंतर त्या दोघांमध्ये मैत्री वाढली होती. हळूहळू ते दोघं एकमेकांच्या जवळ येत गेले.15 / 182018 पासून फरहान अख्तर आणि शिबानी यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. जवळपास चार वर्षे डेट केल्यानंतर ते विवाह झालेत.16 / 18फरहान अख्तर आणि त्याची पहिली पत्नी अधुना भवानी यांचा 16 वर्षाच्या वैवाहिक संसारानंतर 2017 मध्ये घटस्फोट झाला होता.17 / 18शिबानी दांडेकर मॉडेल, अभिनेत्री आहे. पुण्यातील एका मराठी कुटुंबामध्ये शिबानीचा जन्म झाला आहे. तिला अनुषा आणि अपेक्षा नावाच्या दोन बहिणी आहेत.18 / 18शिबानीची बहीण अनुषा हीदेखील सिनेइंड्स्ट्रीशी संलग्न आहे. शिबानीनं भारताबरोबरच अमेरिकेमध्येही काही शो केले आहेत. अमेरिकेच्या नमस्ते इंडिया, एशियन व्हरायटी शो आणि व्ही देसी सारख्या शोमध्ये ती सहभागी झाली होती.