Join us  

कधी मजुरी तर कधी रस्त्यावर विकले पेन! जाणून घ्या, हालाखीचे दिवस पाहिलेल्या जॉनी लिवर यांची एकूण संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 8:00 AM

1 / 11
जॉनी लिवर (Johnny Lever) हे नाव जरी उच्चारलं तरी अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमलतं. गेल्या कित्येक वर्षांपासून जॉन लिवर आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
2 / 11
90's मधल्या अनेक चित्रपटांमध्ये ते झळकले असून आपल्या विनोदामुळे त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळेच देशातील पहिले स्टँडअप कॉमेडियन म्हणून कायम त्यांचा उल्लेख केला जातो.
3 / 11
जवळपास १३ वेळा जॉनी लिवर यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. आतापर्यंत त्यांनी साधारणपणे ३५० चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
4 / 11
आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात लहानाचे मोठे झालेल्या जॉनी लिवर यांची एकेकाळी प्रचंड हालाखीची परिस्थिती होती.
5 / 11
आज करोडो लोकांना हसायला लावणाऱ्या जॉनी लिवर केवळ ७ पर्यंतच शिकले आहेत. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आलं नाही.
6 / 11
दर्द का रिश्ता (1982) या चित्रपटातून जॉनी लिवर यांनी कलाविश्वात पदार्परण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
7 / 11
'मैं बलवान', 'जलवा', 'हत्या', 'हीरो हीरालाल', 'तेज़ाब', 'इलाक़ा', 'जादूगर', 'चालबाज़', 'किशन कन्हैया', 'नरसिम्हा', 'खिलाड़ी', 'अनाड़ी' और 'रूप की रानी चोरों का राजा' यांसारखे अनेक चित्रपट त्यांचे गाजले.
8 / 11
हालाखीच्या परिस्थितीतून वर आलेले जॉनी लिवर आज अमाप संपत्तीचे मालक आहेत. जॉनी लिवर यांचं लोखंडवालामध्ये 3 bhk आलिशान फ्लॅट आहे. या घराची किंमत साधारणपणे १५ कोटींच्या आसपास असेल.
9 / 11
तसंच मुंबईतील अन्य ठिकाणीदेखील त्यांची घरं आहेत. जॉनी लिवर यांच्याकडे Audi Q7,Honda Accord, Toyota Fortuner अशा लक्झरी गाड्या आहेत.
10 / 11
Caknowledge.com च्या रिपोर्टनुसार, जॉनी लिवर महिन्याला १ कोटींची कमाई करतात. ते एका चित्रपटासाठी १ कोटी रुपये मानधन घेतात. २०२२ मध्ये त्यांची एकूण संपत्ती २२७ कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं सांगण्यात येतं.
11 / 11
जॉनी लिवर यांनी एक मुलगी व मुलगा अशी दोन मुलं आहेत. त्यांची लेक जॅमी सुद्धा त्यांच्याप्रमाणेच प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन आहे.
टॅग्स :जॉनी लिव्हरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा