'कल हो ना हो'मधली छोटी क्युट 'जिया' आठवतेय का?, २२ वर्षांनंतर आता दिसते अशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:07 IST
1 / 8दिग्दर्शक निखिल अडवाणी यांच्या 'कल हो ना हो' चित्रपटाची कथा आणि पात्रे आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहेत. शाहरुख खान, सैफ अली खान आणि प्रीती झिंटा यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटात अनेक इतर पात्रे होती, ज्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. त्यापैकीच एक लहान मुलगी जिया कपूरची भूमिका होती.2 / 8जियाचा लूक २२ वर्षांनंतर पूर्णपणे बदलला आहे. २००३ मध्ये 'कल हो ना हो' चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. मनाला भिडणाऱ्या कथेमुळे हा चित्रपट आजही प्रत्येकाचा आवडता मानला जातो. 'कल हो ना हो' मध्ये जियाचे पात्र खूप पसंत केले गेले होते. ही भूमिका अभिनेत्री झनक शुक्लाने साकारली होती.3 / 8क्यूट चेहरा असलेल्या झनकचा लूक आता दोन दशकांनंतर पूर्णपणे बदलला आहे. तिच्या लेटेस्ट फोटोवरून याचा अंदाज सहज लावता येतो. 4 / 8खरेतर, झनक ही टीव्ही आणि चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया शुक्ला यांची मुलगी आहे. 'कल हो ना हो'मुळे रातोरात प्रसिद्धी मिळवलेल्या झनकने आता अभिनय क्षेत्राशी नाते तोडले आहे.5 / 8काही वर्षांपूर्वी ती शेवटची अभिनेत्री म्हणून टीव्ही सीरियल 'गुमराह' मध्ये दिसली होती. तेव्हापासून तिने चित्रपटसृष्टीपासून दूर राहणे पसंत केले आहे.6 / 8झनक शुक्लाच्या खासगी आयुष्याकडे लक्ष दिल्यास, गेल्या वर्षी तिने तिचा दीर्घकाळचा बॉयफ्रेंड स्वप्निल सूर्यवंशी याच्याशी लग्न केले.7 / 8बालकलाकार म्हणून झनक शुक्लाने २००० मध्ये प्रसिद्ध टीव्ही सीरियल 'सोनपरी' मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 8 / 8यानंतर ती अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये दिसली. ती करिश्मा का करिश्मा, हातिम, गुमराह या मालिका, तर कल हो ना हो, डेडलाइन- सिर्फ २४ घंटे, वन नाईट विथ द किंग या सिनेमात ती झळकली आहे.