Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओळखलंत का फोटोतील चिमुकलीला? फक्त पाचवी पास आहे ही बॉलिवूडची अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 13:32 IST

1 / 9
बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर वर्षानुवर्षे इंडस्ट्रीवर राज्य केले आहे. यातील अनेक सेलिब्रेटी सुशिक्षितही आहेत. असे काही स्टार्स आहेत ज्यांनी लहान वयात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्यांचे फारसे शिक्षणही झाले नाही. अशीच एक अभिनेत्री आहे जी पाचवीपर्यंत शिकली. पण तिच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे वर्षानुवर्षे बॉलिवूड स्टार राहिली. या अभिनेत्रीची बहीण देखील बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.
2 / 9
या फोटोत तिच्या धाकट्या बहिणीसोबत दिसणारी मुलगी बॉलिवूडची हिरोईन नंबर १ करिश्मा कपूर आहे. बॉलिवूडच्या कपूर कुटुंबात सून आणि मुलींना चित्रपटात येण्याची परवानगी नव्हती, परंतु असे असतानाही करिश्मा कपूरने कपूर कुटुंबातील पहिली अभिनेत्री बनण्याची जबाबदारी स्वीकारली.
3 / 9
आई बबिता यांच्या मदतीने करिश्माने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. १९९१ मध्ये प्रेम कैदी हा त्यांचा पहिला चित्रपट होता. पहिलाच चित्रपट सुपरहिट झाला आणि करिश्माच्या करिअरला सुरुवात झाली.
4 / 9
यानंतर करिश्मा कपूरने ९० आणि २००० च्या दशकात अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. तिच्या संपूर्ण कारकिर्दीत, करिश्माने साठहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे ज्यात राजा हिंदुस्तानी, हम साथ साथ है, साजन चले ससुराल, दिल तो पागल है, राजा बाबू, हिरो नंबर वन, जिगर, अनारी यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
5 / 9
असे म्हटले जाते की करिश्मा चित्रपटांमध्ये पाऊल ठेवण्यासाठी इतकी उत्साहीत होती की तिने सहाव्या वर्गातच आपले शिक्षण सोडले आणि अभिनय आणि ग्रूमिंगवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. तिची स्टाइल आणि स्टारडम आजही कमी झालेले नाही.
6 / 9
२००३ मध्ये करिश्मा कपूरने बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले. पण हे लग्न जास्त काळ यशस्वी होऊ शकले नाही आणि २०१६ मध्ये करिश्मा आणि संजय कपूर यांचा घटस्फोट झाला.
7 / 9
करिश्मा कपूरला मुलगी समायरा आणि मुलगा कियान ही दोन मुले आहेत. करिश्मा कपूर आपल्या दोन्ही मुलांचे संगोपन छान पद्धतीने करत आहे.
8 / 9
करिश्मा कपूरचे इंस्टाग्रामवर लाखो चाहते आहेत जे तिच्या प्रत्येक अपडेटवर कमेंट करतात.
9 / 9
सोशल मीडियावर करिश्माचे खूप फॅन फॉलोव्हिंग आहे.
टॅग्स :करिश्मा तन्नाकरिना कपूर