Join us

पार्टी, ड्रिंक अन् १४व्या मजल्यावरुन उडी! आत्महत्येनंतरही जिवंत होती दिशा सालियन, पण...; नेमकं काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 14:27 IST

1 / 12
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियनने लॉकडाऊनमध्ये ९ जून २०२१ रोजी आत्महत्या करत जीवन संपवलं. पण, या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं आहे.
2 / 12
दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल करत दिशावर सामुहिक बलात्कार झाल्याचं म्हणत या प्रकरणाची नव्याने सीबीआय चौकशी करावी, असं म्हटलं आहे.
3 / 12
तसंच या याचिकेत त्यांनी आदित्य ठाकरेंवरही आरोप केले आहेत. आदित्य ठाकरेंविरोधात एफआयआर दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
4 / 12
दिशाने ९ जून २०२१ ला मुंबईतील मालाडमधील तिच्या राहत्या घरी आत्महत्या करत जीवन संपवलं होतं. तिने १४व्या मजल्यावरुन उडी मारली होती. आणि त्यातच तिचा मृत्यू झाला होता.
5 / 12
पण, १४व्या मजल्यावरुन उडी मारल्यानंतरही दिशा जिवंत होती, असा खुलासा तिच्या एका मित्राने केला होता.
6 / 12
दिशा सालियनने आत्महत्या केली त्या रात्री नेमकं काय घडलं होतं, ते मित्राने सांगितलं होतं.
7 / 12
ज्या रात्री दिशाने आत्महत्या केली त्यावेळी ती काही मित्र आणि बॉयफ्रेंड रोहनसह पार्टी करत होती.
8 / 12
दिशा पार्टीत दारूही प्यायली होती. पार्टी सुरू असतानाच तिने मध्येच 'कोणालाच माझी काळजी नाही' असं म्हणत स्वत:ला बेडरुममध्ये बंद करून घेतलं होतं.
9 / 12
बराच वेळ दिशा बाहेर न आल्याने मित्र आणि बॉयफ्रेंडने दरवाजा ठोठावला. पण, दिशाने काहीच प्रतिसाद न दिल्याने त्यांना नाईलाजाने दरवाजा तोडावा लागला.
10 / 12
बेडरुमचा दरवाजा तोडल्यानंतर त्यांना धक्का बसला. कारण, दिशाने बाल्कनीतून खाली उडी मारली होती. हे कळताच ते ताबडतोब जिन्याने खाली उतरले.
11 / 12
तोपर्यंत वॉचमॅनने पोलिसांना फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली होती. जेव्हा दिशाला तिच्या मित्रांनी पाहिलं तेव्हा ती जिवंत होती.
12 / 12
मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं, असं दिशाच्या मित्राने सांगितलं होतं.
टॅग्स :सेलिब्रिटीसुशांत सिंग रजपूत