विक्रम गायकवाडची पत्नी आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री, योगयोगेश्वर जयशंकर मालिकेत साकरतेय भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 07:00 IST
1 / 10सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. अभिनेता विक्रम गायकवाडची पत्नीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Photo Instagram)2 / 10अभिनय क्षेत्रात काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. अशीच एक जोडी आहे विक्रम गायकवाड आणि त्याच्या पत्नीची. (Photo Instagram)3 / 10 विक्रम गायकवाड याने मराठी मालिका तसेच चित्रपट सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Photo Instagram)4 / 10उंच माझा झोका मालिकेने विक्रमला अमाप लोकप्रियता मिळवून दिली होती.स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत विक्रमने शहाजीराजेंची भूमिका साकारली होती.(Photo Instagram)5 / 10विक्रमने फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. (Photo Instagram)6 / 10विक्रमची पत्नी अक्षता कुलकर्णीसुद्धा अभिनेत्री आहे. सध्या ती योगयोगेश्वर जयशंकर मालिकेत वंदनाची भूमिका साकारते आहे. (Photo Instagram)7 / 10अभिनेत्री अक्षता कुलकर्णी गायकवाड हिने अनेक नाटक, मालिकांमधून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. हिंदी मालिका मेरे साईं मधून ती महत्वाची भूमिका साकारताना दिसली. (Photo Instagram)8 / 10२०१३ साली अक्षताने लोकप्रिय अभिनेता विक्रम गायकवाड सोबत लग्न केले. दोघांना तावी नावाची मुलगीदेखील आहे. (Photo Instagram)9 / 10या मालिकेनंतर ती बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मराठी मालिकेत झळकत आहे. त्यामुळे वंदनाची भूमिका अक्षतासाठी तितकीच महत्त्वाची आहे.(Photo Instagram)10 / 10