Join us  

'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल अंदाज, फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 9:00 PM

1 / 8
माधुरी दीक्षितने बॉलिवूडवर अनेक वर्षं राज्य केले. प्रेक्षकांच्या या लाडक्या धकधक गर्लने एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले.
2 / 8
दिल, दिल तो पागल है, हम आपके है कौन, बेटा, पुकार यांसारख्या अनेक चित्रपटात माधुरीने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आणि तिच्या या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर देखील घेतल्या.
3 / 8
माधुरीच्या अभिनयाइतकेच तिच्या सौंदर्याचे देखील कौतुक होते. तिने आज वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी ती तितकीच सुंदर दिसते.
4 / 8
बऱ्याचदा माधुरी सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते.
5 / 8
माधुरी दोन मुलांची आई असली तरी ती आजही कोणत्याही तरुणीला लाजवेल इतकी सुंदर दिसते.
6 / 8
माधुरी दीक्षितने बॉलिवूडमध्ये बरेच सुपरहिट सिनेमे दिले असून आताही ती इंडस्ट्रीत एक्टिव्ह आहे.
7 / 8
सध्या ती टेलिव्हिजनवरील डान्स रिएलिटी शो डान्स दिवाने ३ची परीक्षक आहे. या शोमधील ती तिच्या वेगवेगळ्या लूकने चाहत्यांना भुरळ पाडताना दिसते.
8 / 8
माधुरीने १९८४ साली अबोध चित्रपटातून करियरची सुरूवात केली होती. पहिलाच चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता.
टॅग्स :माधुरी दिक्षित