Join us  

'या' अभिनेत्यांनी रुपेरी पडद्यावर साकारली शिवाजी महाराजांची भूमिका, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 3:43 PM

1 / 10
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. संपूर्ण राज्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. महाराजांचा इतिहास आजवर आपण अनेकदा चित्रपट आणि मालिकांमधून पाहिला आहे.
2 / 10
चला तर मग, आज शिवजयंतीच्या निमित्तानं कोणकोणत्या अभिनेत्यांनी पडद्यावर शिवरायांची भूमिका साकारली, त्यावर एक नजर टाकूया...
3 / 10
अमोल कोल्हे यांनी चित्रपट, नाटके, मराठी- हिंदी मालिकांमध्येही छत्रपतींची भूमिका साकारली आहे. त्यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज प्रेक्षकांच्या अगदी मनात उतरले.
4 / 10
अभिनेते महेश मांजरेकर यांनी 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटात छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट, त्यातली गाणी आजही शिवप्रेमींच्या मनावर राज्य करतात.
5 / 10
अभिनेता शंतनू मोघे यांनी संभाजी मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अजरामर करून रसिकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं.शंतनूची महाराजांच्या भूमिकेतील प्रतिमा चाहते विसर शकलेले नाहीत.
6 / 10
मराठमोळा अभिनेता म्हणजे शरद केळकर. शरदने 'तान्हाजी' सिनेमात साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. त्याची ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ''हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत शरदने शूट सुरू झाल्यावर आदराप्रती चप्पल काढून ठेवत असल्याचं सांगितलं.
7 / 10
अभिनेता चिन्मय मांडलेकरने 'सुभेदार' सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना महाराजांची भूमिका साकारताना ‘कृतज्ञता’ ही एकमेव भावना मनात असते असे चिन्मय मांडलेकरने सांगतिले.
8 / 10
शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिणीवर प्रदर्शित झाली होती. या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) याने छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली होती.
9 / 10
अभिनेता गश्मीर महाजनीने शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. 'सरसेनापती हंबीरराव' सिनेमात त्याने साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं.
10 / 10
मराठी सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात अभिनेते सूर्यकांत मांढरे यांनी साकारलेली महाराजांची भूमिका साकारली होती. महाराजांच्या भूमिकेतील प्रतिमा चाहते विसर शकलेले नाहीत.सूर्यकांत यांना प्रत्यक्ष पाहिल्यावर लोक मुजरा करत असत, असं काही ज्येष्ठ लोक सांगतात.
टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजमराठी चित्रपटसिनेमागश्मिर महाजनीचिन्मय मांडलेकरमहेश मांजरेकर भुषण प्रधानशरद केळकरशंतून मोघेसेलिब्रिटीडॉ अमोल कोल्हे