Join us

Tejasswi Prakash : "आईने आम्हाला एकटीने वाढवलं, माझ्यासाठी तिच्या बांगड्या गहाण ठेवल्या"; तेजस्वी प्रकाश भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 12:32 IST

1 / 10
सेलिब्रिटी मास्टरशेफ आजकाल खूप चर्चेत आहे. या शोमध्ये निक्की तांबोळी, गौरव खन्ना, तेजस्वी प्रकाश, दीपिका कक्कर, फैजल शेख, अर्चना गौतम असे स्टार्स दिसत आहेत.
2 / 10
आता लवकरच शोमध्ये एक फॅमिली एपिसोड येणार आहे. या भागात स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांना सपोर्ट करतील. अभिनेत्री तेजस्वी प्रकाशची आई शोमध्ये येणार आहे. याचदरम्यान, तेजस्वी प्रकाश खूप भावुक झालेली पाहायला मिळालं.
3 / 10
तेजस्वीने तिच्या आयुष्यातील संघर्षांबद्दलही सांगितलं. तेजस्वी म्हणाली की, 'बाबा नेहमीच सौदीमध्ये येथे काम करायचे. आईने आम्हाला एकटीने वाढवलं.'
4 / 10
'एका महिलेने एकटीने दोन मुलांना वाढवणं खूप कठीण असतं, विशेषतः जेव्हा त्यापैकी एक मुलगी असते. जेव्हा आम्ही वाईट काळातून जात होतो तेव्हा ती घरोघरी जाऊन पॉलिसी विकायची.'
5 / 10
तेजस्वीची आई यावर म्हणाली -'पैसे नसतील तर आपण काय करायचं? काहीना काही तरी होईल. तेजस्वी नेहमीच माझा आधार राहिली आहे. मी कांदे विकले आहेत.'
6 / 10
'मी माझ्या आईला सांगितलं होतं की मला गाडी हवी आहे. म्हणून माझ्या आईने तिच्या बांगड्या गहाण ठेवल्या आणि माझ्यासाठी एक सेकंड हँड गाडी आणली.'
7 / 10
'जेव्हा मला हे समजलं तेव्हा मी आईला विचारलं की बांगड्या कुठे गेल्या? पण तिने तिच्या बांगड्या माझ्यासाठी गहाण ठेवल्या होत्या. मी तिला त्या लगेच आणायला सांगितल्या.'
8 / 10
'मला एका फॅशन शोसाठी ५ हजार रुपये मिळाले होते आणि ते पैसे मी माझ्या आईला दिले होते' असं देखील तेजस्वी प्रकाशने म्हटलं आहे.
9 / 10
तेजस्वी सध्या अभिनेता करण कुंद्राला डेट करत आहे. दोघेही अनेक वर्षांपासून एकत्र आहेत. त्यांच्या रिलेशनशिपची नेहमीच चर्चा होते.
10 / 10
अभिनेत्रीचे असंख्य चाहते आहेत. ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
टॅग्स :तेजस्वी प्रकाशटेलिव्हिजनटिव्ही कलाकार