दरम्यान, या फोटोमध्ये जान्हवीचा अंदाज मम्मी श्रीदेवीसारखा दिसत आहे. तिच्या चेहºयावरील हास्य बघून हे स्पष्ट होते की, ती कुठल्यातरी विषयामुळे खूपच आनंदी आहे. जान्हवीचे हे फोटो बघून तुमच्याही ही बाब लक्षात येईल. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान ट्रेडिशनल लूकमध्ये बघावयास मिळाली होती. तिच्या ‘केदारनाथ’ या डेब्यू चित्रपटात तिला सिम्पल लूकमध्ये दाखविण्यात येणार असल्याने तिने ट्रेडिशनल लूकची सवय लावण्यास सुरुवात केली होती. आता तिच्या पावलावर पाऊल ठेवताना जान्हवी कपूर दिसली.
जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूविषयी सांगायचे झाल्यास, लवकरच ती तिच्या डेब्यू चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. वृत्तानुसार, येत्या नोव्हेंबर महिन्यापासून ‘सैराट’च्या हिंदी रिमेकच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूरचा लहान भाऊ ईशान खट्टर बघावयास मिळणार आहे. हा चित्रपट मराठी ‘सैराट’चा रिमेक असणार आहे.
दरम्यान, आपल्या लेकीच्या डेब्यूसाठी पप्पा बोनी कपूर खूपच कॉन्फिडेंट आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी म्हटले होते की, माझी मुलगी या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. सध्या ती तिच्या कामावर फोकस ठेवून आहे. चित्रपटात एंट्री करण्याअगोदर तिने क्लासिकल डान्सची ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली आहे.