Join us
Daily Top 2Weekly Top 5

Year Ender 2025: दीपिका-आलियाच्या स्टारडमवर पडल्या भारी! 'या' नव्या चेहऱ्यांनी जिंकली प्रेक्षकांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 15:39 IST

1 / 7
२०२५ हे वर्ष बॉलिवूडसह टॉलिवूड इंडस्ट्रीसाठी अगदीच खास ठरलं आहे. हे वर्ष अनेक नवख्या कलाकारांच्या धमाकेदार एन्ट्रीने गाजलं.
2 / 7
या वर्षामध्ये मोठ्या पडद्यापासून ते ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत, अनेक स्टार किड्स आणि नवीन चेहऱ्यांनी पदार्पण केलं.सारा अर्जुन, राशा थडानी,, अनीत पड्डा आणि सोनम बाजवा यांसारख्या नव्या कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. या अभिनेत्रींनी आपल्या साधेपणा आणि निरागसतेने प्रेक्षकांची मने जिंकली. तसंच दीपिका- आलियाच्या स्टारडमवर या नायिका भारी पडल्याचं पाहायला मिळतंय.
3 / 7
२० वर्षीय सारा अर्जुनने आदित्य धरच्या 'धुरंधर' या स्पाय ॲक्शन चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. सध्या सगळीकडेच या सिनेमाची आणि त्यामध्ये साराने केलेल्या कामाची स्तुती होताना दिसतेय.हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून कमाईचे अनेक विक्रम रचतो आहे.बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, साराने या वर्षातील स्टार-पॉवर्ड अभिनेत्रींच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे.
4 / 7
मोहित सूरी दिग्दर्शित या प्रेमकहाणीवर आधारित चित्रपटाला जेन-झीने अक्षरश:डोक्यावर घेतलं. या चित्रपटातून इंडस्ट्रीला दोन नवीन चेहरे मिळाले. त्यातील एक नाव म्हणजे अनीत पड्डा. पदार्पणाच्या पहिल्याच चित्रपटातून ती चांगली प्रसिद्धीझोतात आली. या चित्रपटातून अभिनेत्री अनित पड्डाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
5 / 7
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी, राशा थडानीने 'आझाद' चित्रपटातून पदार्पण केलं.हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नाही, तरी 'उई अम्मा' गाण्यातील तिच्या नृत्य आणि अभिनयामुळे ती देशभरात प्रसिद्ध झाली. अजय देवगणचा भाचा, अमान देवगणनेही या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं होतं.
6 / 7
पंजाब दी कुडी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम बाजवाने या वर्षी हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण केले.हाऊसफुल 5, बागी 4 आणि विशेषत: एक दिवाने की दिवानीतने या चित्रपटांनी तिला चांगलाच स्टारडम मिळवून दिला. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या एक दीवाने की दीवानियत सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
7 / 7
दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा : चॅप्टर १’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली. या चित्रपटामध्ये राजकुमारी कनकवतीच्या भूमिकेतून तिने प्रेक्षकांची मने जिंकली.रुक्मिणीने आतापर्यंत अनेक गाजलेल्या हिंदी, कन्नड आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.
टॅग्स :बॉलिवूडफ्लॅशबॅक 2025सेलिब्रिटी