Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही प्रसिद्ध अभिनेत्री होणार अर्चना पूरण सिंगची सून; लेकाने कन्फर्म केलं रिलेशनशीप, दिसायला खूप सुंदर

By देवेंद्र जाधव | Updated: July 15, 2025 17:52 IST

1 / 7
'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये दिलखुलास हसणारी आणि सर्वांना खळखळून हसवणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे अर्चना पूरण सिंग. अर्चनाच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत
2 / 7
अर्चना पूरण सिंगचा मोठा मुलगा आर्यमान सेठीने त्याच्या युट्यूब चॅनलद्वारे रिलेशनशीपचा खुलासा केला आहे. 'द केरला स्टोरी' या सिनेमातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री योगिता बिहानीला आर्यमान डेट करतोय
3 / 7
या दोघांनी 'छोटी बाते' नावाच्या म्यूझिक व्हिडीओमध्ये काम केलं होतं. त्याचवेळी दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात होतं. पण आता आर्यमान-योगिताने त्यांचं रिलेशनशीप कन्फर्म केलं आहे
4 / 7
योगिता आगामी प्रोजेक्टचं शूटिंग करण्यासाठी हैदराबादला होती. तेव्हा तिला सरप्राईज द्यायला आर्यमान हैदराबादला गेला. आर्यमान तिच्यासाठी फुलांचा गुच्छ घेऊन जातो. पुढे दोघं एकमेकांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलतात.
5 / 7
योगिताबद्दल सांगायचं तर ती सुद्धा एक अभिनेत्री असून दिल ही तो है, विक्रम वेधा, द केरला स्टोरी अशा सिनेमांमधून योगिताने अभिनय केलाय. योगिताच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं
6 / 7
मला वाटलं नव्हतं की, आमचं नातं इतक्या लवकर सर्वांना कळेल, पण हो आम्ही एकमेकांना डेट करतोय, असा खुलासा योगिताने हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितला. अशाप्रकारे योगितानिमित्त अर्चना यांना अभिनेत्रीच सून मिळणार आहे.
7 / 7
योगिता आणि आर्यमानचा तूर्तास लग्नाचा कोणताही विचार नाही. दोघेही सध्या डेटिंगचा सुरुवातीचा काळ एन्जॉय करताना दिसत आहेत.
टॅग्स :अर्चना पूरण सिंगकपिल शर्मा बॉलिवूडदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट