'वीराना' सिनेमातील बोल्ड 'चेटकीन' जॅस्मीन अचानक कुठे गायब झाली? अनेक अभिनेत्रींना पडत होती भारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 19:04 IST
1 / 8Bollywood Actress: बॉलिवूडमध्ये सुंदर अभिनेत्रींचा नेहमीच बोलबाला राहिला आहे. या अभिनेत्रींवर तर अंडरवर्ल्डमधील लोकही जीव ओवाळायचे. यात अभिनेत्री मंदाकिनी ते मोनिका बेदी यांचा समावेश होता. यात आणखी एक नाव होतं ते म्हणजे ९०च्या दशकातील 'वीराना' सिनेमातील अभिनेत्री जॅस्मीन. एखाद्या बाहुलीसारखी सुंदर दिसणाऱ्या जॅस्मीनचं सौंदर्यच तिचं वैरी ठरलं. ज्यामुळे ती एकाएकी फिल्म इंडस्ट्रीतून गायब झाली. 2 / 8जॅस्मीनने ९०च्या दशकापासून ते आतापर्यंतची सर्वात सुंदर 'चेटकीन' आहे. तिच्या इतकी सुंदर चेटकीन आतापर्यंत कोणत्याच हॉरर सिनेमा बघायला मिळाली नाही. जॅस्मीनने वीरानानंतर 'बंद दरवाजा', 'डाक बंगला' आणि 'पुरानी हवेली' सारख्या सिनेमात काम केलं. त्यानंतर ती अचानक गायब झाली. रातोरात लोकप्रिय झालेली जॅस्मीन आता कुठे गेली आहे?3 / 8जॅस्मीनचं पूर्ण नाव जॅस्मीन धुन्ना आहे. पण काही रिपोर्ट्सनुसार ती जॅस्मीन भाटिया होती. तिच्या नावाबाबत आणि परिवाराबाबत काही ठोस माहिती नाही. जॅस्मीनने १९७९ मध्ये विनोद खन्नासोबत 'सरकारी मेहमान' मधून डेब्यू केलं होतं. त्यानंतर डायवोर्समध्ये ती शर्मिला टागोरसोबत दिसली. तोपर्यंत जॅस्मीनला कुणी ओळखत नव्हतं.4 / 8१९८४ मध्ये वीरानामधील भूमिकेने ती इतकी फेमस झाली की, अंडरवर्ल्डच्या नजरेत आली. डॉन तिला फोन करून त्रास देऊ लागले होते. असं म्हणतात की त्यांच्यापासून वाचवण्यासाठी ती शहरच नाही तर भारत सोडून गेली आणि अमेरिकेत शिफ्ट झाली. पण याबाबत काही ठोस पुरावे नाही. कारण काही लोक सांगतात की, जॅस्मीनने लग्न केलं आणि आता ती जॉर्डनममध्ये राहते. तर काही लोक म्हणतात ती आता या जगात नाही. 5 / 8याचा ठोस पुरावा आहे की, जॅस्मीन २०१७ पर्यंत ठीक होती. कारण वीरानाचे दिग्दर्शक श्याम राम यांनी २०१७ मध्ये दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, जॅस्मीन पूर्णपणे ठीक आहे आणि मुंबईत राहते. आईच्या मृत्यूमुळे जॅस्मीनने सिनेमात काम न करण्याचा निर्णय घेतला.6 / 8मुलाखती दरम्यान ते असंही म्हणाले होते की, ते वीराना २ बनवण्याचा विचार करत आहेत आणि त्यात ते जॅस्मीनला घेतील. पण २०१९ मध्ये श्याम राम यांचं निधन झालं. जॅस्मीनला पुन्हा बघण्याची आशा त्यांच्यासोबत संपली.7 / 8जॅस्मीन एक रहस्य बनून राहिली आहे. बॉलिवूडमधून अंडरवर्ल्डमुळे अभिनेत्रींचं असं अचानक गायब होणं काही नवीन बाब नाही. अंडरवर्ल्डने बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रीचं करिअर बर्बाद केलं आहे. त्यातीलच एक जॅस्मीन आहे.8 / 8९०च्या दशकात तिने घाबरवून लोकांचं मनोरंजन केलं. लोक फक्त तिला बघण्यासाठी सिनेमा बघायचे. आजही लोक तिची आठवण काढतात. कारण ती हॉरर सिनेमाची सर्वात लोकप्रिय हिरोईन ठरली.