हनिमूननंतर दिसला बॉयफ्रेंड पतीचा खरा चेहरा, अभिनेत्रीसोबत केलं असं काही...; १२ दिवसांतच मोडलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:45 IST
1 / 8देशात सोनम-राजा रघुवंशी प्रकरणाची सगळीकडे चर्चा असताना अभिनेत्रीने तिच्या हनिमूनची भयावह आठवण सांगितली आहे. 2 / 8बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे हिने २०२० मध्ये बॉयफ्रेंड सॅम बॉम्बे याच्याशी लग्न केलं होतं. पण, लग्नानंतर काही वर्षांतच अभिनेत्रीचा घटस्फोट झाला. 3 / 8पूनम पांडेच्या घटस्फोटाला तिचं लग्नानंतरचं हनिमून कारण ठरलं. पूनमने तिच्या नवऱ्यावर मारहाण आणि घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. 4 / 8पूनम पांडे कंगना रणौतच्या लॉकअप शोमध्ये सहभागी झाली होती. तिने या शोमध्ये अनेक खुलासे केले होते. 5 / 8सॅम माझ्यावर संशय घ्यायचा. तो मला मारायचा. मला फोन वापरायलाही बंदी होती, असं पूनम म्हणाली होती. 6 / 8लग्नानंतर हनिमूनला गेल्यावर सॅमने मारहाण केल्याचंही पूनमने सांगितलं होतं. 7 / 8एवढचं नव्हे तर हनिमूनला असतानाच तिने नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला तुरुंगाची हवा खायला लावली होती. 8 / 8लग्नाआधी पूनम आणि सॅम ३ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. पण, लग्नानंतर १२ दिवसांतच त्यांचा घटस्फोट झाला होता.