सिद्धार्थ केवळ अभिनयावरच लक्षकेंद्रित करून उत्तम चित्रपटांची निर्मिती करतोय असे नव्हे तर त्यातून स्वत:साठी वेळ काढून तो सध्या न्यूझीलँडच्या प्रेमात पडलेला दिसतोय. त्याचं झालं असं की, तो ‘न्यूझीलँड टुरिझम’चा ब्रँड अॅम्बेसेडर बनला आहे. त्यामुळे तो सध्या पेनिन्सुला या नदीच्या किनाऱ्याकाठी वसलेले छोटेसे गाव ‘आकारोआ’ येथे निसर्गसौंदर्याचा आनंद उपभोगत आहे.
बिझी शेड्यूलमधून स्वत:साठी थोडा वेळ काढल्याने त्याला रोजच्या शूटिंगचा काही काळ विसर पडलाय. त्याने नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ मी आणि माझा मित्र अभिषेक बधवार आम्ही डॉल्फिनप्रमाणे या नदीत छान पोहण्याचा आनंद लुटणार आहोत.’