पार्टीत प्रियांका चोप्राने एकदम साध्या वेशात एन्ट्री घेतली. आकाशी रंगाच्या स्लिव्हलेस टॉप आणि फ्लॉव्हर प्रिंटेड स्कर्टमध्ये ती आली. तिने फोटोग्राफर्सना अशी पोझ दिली.
निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मराठी कलाकार श्रुती मराठे पार्टीत आली होती. या निळ्या रंगातील तिचे सौंदर्य अजूनच खुलून दिसत होते.
‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हे देखील पार्टीत सहभागी झाले होते. त्यांचा डॅशिंग लुक फोटोग्राफर्सनी कॅमेऱ्यात कैद केला.
मराठी अभिनेता जितेंद्र जोशी याने या पार्टीला हजेरी लावली. त्याचा बिअर्ड लुक सगळ्यांसाठी लक्षवेधी ठरला.