Join us  

IN PICS : एक-दोन नव्हे, बॉलिवूड बनवतंय ‘या’ 9 ब्लॉकबस्टर साऊथ सिनेमांचे रिमेक!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 8:00 AM

1 / 9
साऊथ सुपरस्टार आर. माधवन व विजय सेतुपती यांच्या सुपरडुपर हिट ‘विक्रम वेधा’ या सिनेमाचा हिंदी रिमेक लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. यात बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन व सैफ अली खान लीड रोलमध्ये दिसणार आहे.
2 / 9
कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ हा सिनेमा ‘अला वैकुंठपुरमलो’ या तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे.‘अला वैकुंठपुरमलो’ मध्ये अल्लू अर्जुन दिसला होता. शहजादा मध्ये कार्तिक लीड रोलमध्ये आहे.
3 / 9
ब्लॉकबस्टर ‘जर्सी’ या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘जर्सी’ याच नावाने प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. यात शाहिद कपूर लीड रोलमध्ये आहे.
4 / 9
सुपरडुपर हिट ‘कैथी’ हा तामिळ चित्रपट अजय देवगण रिक्रिएट करणार आहे. ‘कैथी’ हिट होताच अजयने याची घोषणा केली होती.
5 / 9
धुरूवंगन पथिनारू हा तामिळ चित्रपट चांगलाच गाजला. याचा रिमेक ‘सनकी’ या नावानं प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. यात वरूण धवन लीड रोलमध्ये दिसणार आहे.
6 / 9
विजय सेतुपती स्टारर ‘मानाग्राम’ याचा हिंदी रिमेक ‘मुंबईकर’ नावाने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या हिंदी रिमेकमध्ये विजय सेतुपती व विक्रांत मेस्सी लीड रोलमध्ये दिसणार आहेत.
7 / 9
अभिनेता अरूण विजय याच्या ‘थडम’ या चित्रपटाचा रिमेकही येत्या काळात प्रदर्शित होतोय आणि यात सिद्धार्थ मल्होत्रा लीड रोलमध्ये आहे.
8 / 9
जान्हवी कपूरचा ‘गुड लक जेरी’ हा चित्रपटही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जान्हवीचा हा आगामी सिनेमा ‘कोलमावु कोकिला’ या तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे.
9 / 9
आरूवी हा एक सुपरहिट तामिळ चित्रपट. याच्या हिंदी रिमेकमध्ये फातिमा सना शेख मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
टॅग्स :बॉलिवूडTollywood