यावेळी सारा पुन्हा एकदा ट्रेडिशनल लूकमध्ये बघावयास मिळाली. वास्तविक गेल्या काही दिवसांपासून सारा ट्रेडिशनल लूकमध्येच अधिक बघावयास मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीदेखील सारा सूटमध्ये बघावयास मिळाली होती. जेव्हा सारा रीडिंग सेशननंतर घराकडे जाण्यास निघाली होती, तेव्हाच तिचे काही फोटोज् कॅमेºयात कैद करण्यात आले.
फोटोमधील साराचा अंदाज बघण्यासारखा आहे. शिवाय तिच्या चेहºयावरील दडपणही स्पष्टपणे दिसत आहे. एरवी नेहमीच स्माइल करताना दिसणारी सारा खूपच धीरगंभीर असल्याचे दिसत होते. सारा जेव्हा कारमध्ये बसली तेव्हाच तिने माध्यमांच्या कॅमेºयांकडे थोडीसी स्माइल करून बघितले. त्यानंतर ती मोबाइलवर बोलण्यात व्यस्त झाली. जेव्हा ती मोबाइलवर बोलत होती, तेव्हा ती काहीतरी गंभीर बोलत असावी, असेच हावभाव तिच्या चेहºयावर दिसत होते.
एक गोष्ट तर स्पष्ट आहे की, सारा या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत असून, दमदार एंट्री करण्यासाठी ती कुठलीच कसर सोडू इच्छित नाही. सारा ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर करणार असून, साराच्या अपोझिट अभिनेता सुशांतसिंग राजपूत असेल. २४ वर्षीय सारा तिच्या स्टाइलसाठी ओळखली जाते.
तिचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो चाहत्यांना वेड लावणारे असतात. सोशल मीडियावर साराचे नेहमीच फोटो शेअर केले जातात. त्याचबरोबर ट्रेडिशनल अवतारातही ती खूपच सुंदर दिसते. चाहत्यांना साराच्या या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, सारा ज्या पद्धतीने आपल्या पहिल्याच बॉलिवूडपटासाठी तयारी करीत आहे, त्यावरून तिची एंट्री दमदार ठरेल यात शंका नाही.