Join us  

विद्युत जामवाल पडला ‘या’ फॅशन डिझायनरच्या प्रेमात? करिश्माशी आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 6:09 PM

1 / 8
बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो विद्युत जामवाल सध्या काय तर रिलेशनशिप स्टेट्समुळे चर्चेत आहे. होय, विद्युत एका फॅशन डिझायनरला डेट करत असल्याची चर्चा आहे.
2 / 8
चर्चा खरी मानाल तर, बॉलिवूडची दिग्गज फॅशन डिझायनर नंदिता माहतानीला डेट करतोय.
3 / 8
नंदिताने विद्युतसोबतचा एक फोटो शेअर केला आणि या चर्चेला आणखी बळ मिळाले.
4 / 8
नंदिता माहतानी ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिनेअनेक प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांसाठी काम केले आहे.
5 / 8
विशेष म्हणजे, नंदिता ही करिश्मा कपूरचा एक्स- हसबण्ड संजय कपूरची पहिली पत्नी आहे.
6 / 8
नंदिताशी घटस्फोट झाल्यानंतर संजयनं करिश्माशी लग्न केले होते. आता मात्र तिच्या व विद्युतच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आले आहे.
7 / 8
बॉलिवूडमध्ये विद्युत जामवाल त्याच्या स्टंटसाठी ओळखला जातो. आपल्या सिनेमासाठी स्वत: स्टंट करण्यावर विद्युत जामवालचा भर असतो.
8 / 8
सोशल मीडियावरही तो प्रचंड सक्रीय असतो. त्याचे जगभरात चाहते आहेत. सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येत चाहते त्याला फॉलो करतात.
टॅग्स :विद्युत जामवाल