मालाडच्या चाळीत वाढला, आज गाजवतोय बिग स्क्रीन; प्रेक्षकांचा लाडका अभिनेता कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 16:45 IST
1 / 8मुंबईतील चाळीत जन्माला आलेला असा अभिनेता जो आज मोठ्या स्क्रीनवर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. प्रभावी अभिनेत्यांच्या यादीत आज त्याचं नाव आवर्जुन घेतलं जातं.2 / 8तो अभिनेता आहे विकी कौशल (Vicky Kaushal). हो विकी कौशल मुंबईतील मालाडमध्ये चाळीतील १० बाय १० च्या खोलीत लहानाचा मोठा झाला. विकीने राजीव गांधी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून इंजनिअरिंगची पदवी घेतली आहे. 3 / 8विकीचे वडील श्याम कौशल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टंटमॅन होते. मात्र ते त्यांच्या काळात इंडस्ट्रीत संघर्षच करत होते. त्यामुळे कौशल कुटुंबाने आर्थिक तंगीचाही सामना केला.4 / 8विकी अभ्यासात हुशार होता. त्याची स्वप्न मोठी होती. आयटी कंपनीच्या टूरमध्ये तो गेला असता त्याला काहीतरी वेगळं करण्याची प्रेरणा मिळाली. यानंतर त्याने किशोर नामित कपूर यांच्या अॅक्टिंग अकादमीत प्रवेश घेतला. 5 / 8विकीने मुलाखतीत सांगितलं होतं की, ' मी शालेय जीवनापासून चांगला अभिनय आणि डान्स करत असलो तरी मी अभिनेता बनण्याचे कधीच ठरवले नव्हते. माझे वडील शूटवर जायचे, त्यावेळी तुम्ही मला पण घेऊन जा... मला तुमच्या चित्रपटातील नायकाला भेटायचे आहे असे मी त्यांना सांगायचो.'6 / 8'माझ्या घरात फिल्मी वातावरण नव्हते आणि आम्ही चित्रपटांविषयी घरी चर्चा देखील करायचो नाही. माझे वडील इंडस्ट्रीतील असले तरी माझे बालपण हे एखाद्या सामान्य मुलाप्रमाणे होते.'7 / 8२०१५ साली 'मसान' मधून विकीने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. रमण राघव, मनमर्जिया, संजू, राझी आणि उरीः द सर्जिकल स्ट्राईक, भूत या सगळ्याच विकीच्या भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. 8 / 8पण विकीसाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याचे वडील श्याम कौशल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध ॲक्शन डायरेक्टर असले तरी विकीने त्याच्या स्वतःच्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे.