By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 15:24 IST
1 / 11दिल्लीच्या मंडोली जेलमध्ये बंद असलेला महाठग सुकेश चंद्रशेखर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने त्याने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला एक लव्हलेटर लिहिलं आहे.2 / 11सुकेश यावेळी जॅकलिनला चक्क 'एअरबस H-सीरीज' हेलिकॉप्टर भेट दिल्याचा मोठा दावा केला आहे. याआधी देखील त्याने प्रायव्हेट जेट, फ्रान्समध्ये द्राक्षाची बाग, आलिशान बंगला भेट म्हणून दिला आहे. 3 / 11आपल्या पत्रात सुकेशने जॅकलिनला 'माय बेबी बोम्मा', 'वावा', 'एंजल' आणि 'जॅकी' अशा नावांनी संबोधलं आहे. त्याने म्हटलं आहे की, जेलच्या भिंती जरी त्यांना वेगळं करत असल्या, तरी त्याच्या हृदयाची प्रत्येक धडधड फक्त जॅकलिनचच नाव घेते.4 / 11पत्रात सुकेशने त्यांच्या 'प्रेमकथे'ची तुलना रोमिओ-ज्यूलिएट, हीर-रांझा, लैला-मजनू आणि अँटनी-क्लिओपात्रा यांच्याशी केली आहे. जॅकलिनला कायदेशीर अडचणी, मानहानी आणि तणावाचा सामना करावा लागला, त्याला मीच जबाबदार आहे, असं त्याने लिहिलं. 5 / 11आता हे वादळ संपणार असून लवकरच सर्व काही ठीक होईल असा विश्वास त्याने व्यक्त केला. सुकेशने म्हटलं की, 'मी तुला कधीही सोडणार नाही, या जन्मातही नाही आणि पुढच्या जन्मातही नाही. तू फक्त माझीच आहेस.'6 / 11सुकेशने पत्रात नमूद केलं की, तो जॅकलिनला कस्टम इंटीरियर असलेले एअरबस हेलिकॉप्टर भेट देत आहे. या हेलिकॉप्टरवर बाहेरून आणि आतून 'JF' ही अक्षरे (इनिशियल्स) कोरलेली असतील आणि त्याचा रंग तिच्या जेट आणि यॉटशी मिळताजुळता असेल. 7 / 11हे हेलिकॉप्टर माझ्या मेहनतीच्या कमाईतून खरेदी केले आहे, कोणत्याही गुन्ह्यातील नाही. मात्र कायदेशीर प्रकरणांमुळे जॅकलिन कदाचित याचा तात्काळ वापर करू शकणार नाही, हे देखील त्याने मान्य केलं.8 / 11सुकेशने असं पत्र लिहिण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही व्हॅलेंटाईन, ख्रिसमस, नवरात्री आणि जॅकलिनच्या वाढदिवसानिमित्त त्याने अशाच प्रकारची पत्रं लिहून प्रायव्हेट जेट, वाईनयार्ड, पेंटहाऊस आणि लक्झरी कार सारख्या महागड्या भेटवस्तूंचा दावा केला होता.9 / 11गेल्या व्हॅलेंटाईन डेलाही त्याने कस्टमाइज्ड 'गल्फस्ट्रीम प्रायव्हेट जेट' भेट दिल्याचं म्हटलं होतं. सुकेश नेहमीच त्याचं जॅकलिनवर असलेलं प्रेम व्यक्त करत असतो. 10 / 11अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने अनेकदा स्पष्ट केलं आहे की, तिचे सुकेशसोबत कोणतेही संबंध नव्हते. महागड्या भेटवस्तू किंवा त्या कोठून आल्या, याबद्दल आपल्याला काहीही माहिती नव्हती असं तिने सांगितलं आहे.11 / 11सुकेश चंद्रशेखर हा २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग आणि फसवणुकीच्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे, ज्यामध्ये अनेक फिल्मी सेलिब्रिटींची नावं समोर आली होती.