By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 17:55 IST
1 / 10९० च्या दशकात आपल्या नृत्याने आणि अदांनी संपूर्ण देशाला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकर. आज उर्मिला आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे2 / 10आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्यातील अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया, ज्याने तिचं करिअर आणि वैयक्तिक आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं.3 / 10उर्मिलाने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. उर्मिलाचा जन्म ४ फेब्रवारी १९७४ रोजी मुंबईत एका महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला. तिने मुंबईतील रुपारेल कॉलेजमध्ये पदवी शिक्षण घेतलं. तिने वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली4 / 10उर्मिला मातोंडकरने 'कर्मा' आणि 'मासूम' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणून काम केलं. पण उर्मिलाला खरी ओळख 'रंगीला' चित्रपटातून मिळाली, हा मुख्य अभिनेत्री म्हणून तिचा पहिला चित्रपट होता. 5 / 10दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्या 'रंगीला' चित्रपटाने उर्मिलाला रातोरात सुपरस्टार बनवलं. मात्र, हळूहळू उर्मिला केवळ राम गोपाल वर्मा यांच्याच चित्रपटात दिसू लागली. या दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी बॉलिवूडमध्ये खळबळ माजवली होती.असं म्हटलं जातं की, राम गोपाल वर्मा यांच्या पत्नीला जेव्हा या नात्याबद्दल कळलं, तेव्हा त्यांनी रागाच्या भरात उर्मिलाच्या कानाखाली लगावली होती. 6 / 10या वादामुळे उर्मिलाचं करिअरही धोक्यात आलं. चित्रपटसृष्टीतील इतर दिग्दर्शकांनी उर्मिलाला काम देणं बंद केलं आणि हळूहळू ही सुपरस्टार अभिनेत्री इंडस्ट्रीतून गायब झाली.7 / 10करिअरमध्ये आलेल्या अपयशानंतर उर्मिलाने आपल्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित केलं. तिची आणि काश्मिरी व्यावसायिक मोहसीन अख्तर मीर यांची भेट फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी झाली. 8 / 10मोहसीन उर्मिलापेक्षा १० वर्षांनी लहान होता. सुरुवातीला उर्मिलाने लग्नाला नकार दिला, पण मोहसीनच्या प्रेमापुढे तिने अखेर होकार दर्शवला. वयाच्या ४२ व्या वर्षी उर्मिलाने मोहसीनसोबत निकाह करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. उर्मिला आणि मोहसीनचा संसार सुखाचा सुरू आहे असं वाटत असतानाच, सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांना हादरवून सोडलं. 9 / 10परस्पर संमतीने या दोघांनी आपले आठ वर्षांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. धर्माच्या आणि वयाच्या भिंती ओलांडून एकत्र आलेल्या या जोडीचा शेवट असा होईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं.10 / 10आज उर्मिला चित्रपटांत सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. ५२ व्या वर्षीही तिचं सौंदर्य आणि तिची फॅशन तरुण अभिनेत्रींना टक्कर देणारी आहे.