Join us

"माझ्या जवळ ये आणि मला मिठी मार"; उर्फी जावेदने सांगितला कास्टिंग काउचचा भयंकर अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 16:57 IST

1 / 9
अभिनेत्री उर्फी जावेदने तिला आलेला कास्टिंग काउचचा भयंकर अनुभव सांगितला आहे.
2 / 9
उर्फीने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत कास्टिंग काउचबाबत मोठा खुलासा केला आहे.
3 / 9
'मी जेव्हा मुंबईत नवीन आली तेव्हा एका डायरेक्टरने मला आपल्या घरी ऑडिशनसाठी बोलावलं.'
4 / 9
'कॅमेरा पण नव्हता. तो मला म्हणाला, तू माझी गर्लफ्रेंड आहेस अशी एक्टिंग कर. माझ्या जवळ ये आणि मला मिठी मार.'
5 / 9
'मला वाटलं की कोणत्या प्रकारची ऑडिशन आहे?, कॅमेरा कुठे आहे? पण नाही म्हणण्याऐवजी मी ते केलं.'
6 / 9
'सर, मी जाते असं त्यानंतर मी त्याला सांगितलं. मी अशा अनेक घटनांमधून गेलेली आहे' असं उर्फीने म्हटलं आहे.
7 / 9
उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत.
8 / 9
उर्फी तिच्या अतरंगी फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा अजब फॅशन सेन्स नेहमीच लोकांचं लक्ष वेधून घेत असतो.
9 / 9
टॅग्स :उर्फी जावेदबॉलिवूड