Join us  

वयाची पन्नाशी उलटूनही या कारणामुळे माधुरी दीक्षित दिसते तितकीच सुंदर, हे आहेत तिचे ब्युटी सिक्रेट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 4:47 PM

1 / 9
माधुरी दीक्षितने बॉलिवूडवर अनेक वर्षं राज्य केले. प्रेक्षकांच्या या लाडक्या धकधक गर्लने एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले.
2 / 9
दिल, दिल तो पागल है, हम आपके है कौन, बेटा, पुकार यांसारख्या अनेक चित्रपटात माधुरीने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आणि तिच्या या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर देखील घेतल्या.
3 / 9
माधुरीच्या अभिनयाइतकेच तिच्या सौंदर्याचे देखील कौतुक होते. तिने आज वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी ती तितकीच सुंदर दिसते.
4 / 9
माधुरीच्या सौंदर्याचे रहस्य काय आहे याविषयी तिनेच एका मुलाखतीत सांगितले आहे. माधुरी कोणत्याही ब्युटी प्रोडक्ट्सवर विश्वास न ठेवता तिच्या सौंदर्यासाठी काही घरगुती उपाय करते.
5 / 9
माधुरीची त्वचा ही आजही एखाद्या २५-३० वर्षांच्या मुलीसारखीच आहे. तिने हरजिदंगी या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत याचे रहस्य सांगितले होते.
6 / 9
माधुरीने या मुलाखतीत सांगितले होते की, जसजसं तुमचं वय वाढतं तसतसा तुमच्या त्वचेचा ग्लो कमी होतो आणि तुम्हाला डार्क सर्कल देखील यायला लागतात. पण यावर उपाय म्हणजे काकडी आणि दूध.
7 / 9
तिने पुढे सांगितले होते की, काकड्याच्या पातळ चकत्या करून त्या दुधात भिजवायच्या आणि या दुधात भिजवलेल्या काकड्या काही काळासाठी फ्रिजमध्ये ठेवायचे. त्या थंड झाल्या की या काकड्या संपूर्ण चेहऱ्यावर चोळायच्या.
8 / 9
माधुरी दोन मुलांची आई असली तरी ती आजही कोणत्याही तरुणीला लाजवेल इतकी सुंदर दिसते.
9 / 9
माधुरी गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर अक्षरशः राज्य करत आहे.
टॅग्स :माधुरी दिक्षित