Join us  

या फिल्मी स्टार्सने जाहिरातींतून केली कोटींची कमाई! अक्षय कुमारची कमाई वाचून व्हाल थक्क!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 11:47 AM

ब्रँड इंडॉर्समेंट अर्थात ब्रँडचा प्रचार-प्रसार करणा-या जाहिराती हे सेलिब्रिटींसाठी मोठे मार्केट आहे. ऐकून धक्का बसेल पण ईएसपीच्या ताज्या रिपोर्टनुसार, २०१७ मध्ये सेलिब्रिटीज इंडॉर्समेंट मार्केट ७९५ कोटी रूपयांचे होते. पुढच्याच वर्षी म्हणजे २०१८ मध्ये ते वाढून ९९५ कोटींवर पोहोचले.

ठळक मुद्दे बॉलिवूड इंडस्ट्रीत यशाची खात्री देणारा स्टार कुठला तर अक्षय कुमार. त्यामुळेच त्याची बँड व्हॅल्यूही मोठी. याचमुळे २०१८ मध्ये अक्षयने जाहिरातून १०० कोटींची कमाई केली.

ब्रँड इंडॉर्समेंट अर्थात ब्रँडचा प्रचार-प्रसार करणा-या जाहिराती हे सेलिब्रिटींसाठी मोठे मार्केट आहे. ऐकून धक्का बसेल पण ईएसपीच्या ताज्या रिपोर्टनुसार, २०१७ मध्ये सेलिब्रिटीज इंडॉर्समेंट मार्केट ७९५ कोटी रूपयांचे होते. पुढच्याच वर्षी म्हणजे २०१८ मध्ये ते वाढून ९९५ कोटींवर पोहोचले. यातला सर्वाधिक मोठा शेअर कुणाचा तर असेल तर अक्षय कुमारचा. होय, गतवर्षभरात अक्षयने जाहिरातीतून १०० कोटी रूपये कमावले. बॉलिवूड इंडस्ट्रीत यशाची खात्री देणारा स्टार कुठला तर अक्षय कुमार. त्यामुळेच त्याची बँड व्हॅल्यूही मोठी. याचमुळे २०१८ मध्ये अक्षयने जाहिरातून १०० कोटींची कमाई केली.

रणवीर सिंग

अक्षयच्या पाठोपाठ रणवीर सिंगने २०१८ सालात जाहिरातीतून ८४ कोटी रूपयांची कमाई केली. गतवर्षी त्याचे सगळे चित्रपट हिट झालेत. सोबत जाहिरातीतूनही त्याने बक्कळ कमाई केली.

दीपिका पादुकोण

 

रणवीर सिंगची बँड व्हॅल्यू वाढत असताना दीपिका पादुकोण का मागे राहणार. तिनेही गतवर्षी जाहिरातीतून ७५ कोटी रूपयांची कमाई केली.

अमिताभ बच्चन 

महानायक अमिताभ बच्चन हेही मागे नाहीत. गतवर्षी जाहिरातीतून त्यांना ७२ कोटी रूपयांची कमाई केली.

आलिया भट

२०१८ वर्ष आलिया भटसाठी चांगले राहिले. या वर्षात अ‍ॅड फिल्ममधून तिने ६८ कोटी रूपये कमवले.

शाहरूख खान

शाहरूख खान एकेकाळी सर्वाधिक जाहिराती करायचा. गतवर्षी त्याने जाहिरातीतून केवळ ५६ कोटी रूपयांची कमाई केली.

वरूण धवन

अ‍ॅड फिल्मच्या बाबतीत वरूणही मागे नाही. त्याने गतवर्षी यातून ४८ कोटी रूपये मिळवलेत.

सलमान खान 

सलमान खान चित्रपट, टीव्ही शोमध्ये बिझी आहे. याऊपर  गतवर्षी त्याने जाहिरातीतून ४० कोटींची कमाई केली.

करिना कपूर

आई बनल्यानंतर करिना कपूरचे स्टारडम संपुष्टात येईल, असे मानले गेले होते. पण करिनाबद्दल असे काही झाले नाही. २०१८ मध्ये अ‍ॅड फिल्ममधून तिने ३२ कोटींची कमाई केली.

कतरीना कैफ

टायगर जिंदा है या चित्रपटानंतर कॅटचे करिअर पुन्हा मार्गी लागले आहे. कतरीनाने गतवर्षी जाहिरातीतून ३० कोटी रूपयांची कमाई केली.

टॅग्स :अक्षय कुमाररणवीर सिंगदीपिका पादुकोणआलिया भटअमिताभ बच्चन