Join us
Daily Top 2Weekly Top 5

या ‘बिकीनी बेब्स’ वेड लावतील !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 12:02 IST

बॉलीवुडच्या सिनेमांमध्ये रोमान्स, एक्शन, कॉमेडी, इमोशन पाहायला मिळतं. मात्र सिनेमांमध्ये रसिकांना भावेल असा मसालाही असतो. आता तुम्हीला दाखवतोय अशाच ...

बॉलीवुडच्या सिनेमांमध्ये रोमान्स, एक्शन, कॉमेडी, इमोशन पाहायला मिळतं. मात्र सिनेमांमध्ये रसिकांना भावेल असा मसालाही असतो. आता तुम्हीला दाखवतोय अशाच बी-टाऊनच्या बिकीनी गर्ल ज्या आपल्या स्पाईसी लूक आणि बोल्ड-हॉट अंदाजातून सिनेमांमध्ये मसाला आणतात. त्यांना पाहून तुम्हीही WOW म्हटल्याशिवाय राहणार नाही. आलिया भट्टचा हा गुलाबी बिकीनीमधला अंदाज तुम्हाला नक्कीच घायाळ करेल. आलिया आता नक्कीच स्टुडंट राहिली नसल्याचं या तिच्या या अदांवरुन कळतंय.फिजीचा हा सुंदर समुद्रकिनारा... सुंदर बीच.. बीचवर मादक सोनल चौहानच्या घायाळ करणा-या अदा....रेड हॉट बिकीनी लूकमधल्या सोनलची बरीच चर्चा झाली. मात्र तिचा हा अवतार जेनिफर लोपेझशी मिळताजुळता असल्याचं बोललं गेलं. हॉट, सेक्सी हे शब्द जिच्या नावाआधी लावले जातात ती म्हणजे सनी लिओनी. बॉलीवुडच्या सिनेमातून वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या सनीचा हा हॉट बिकीनी अवतार.. असा कुणीही सापडणार नाही जो सनीच्या या लीलांवर फिदा होणार नाही. 'हेट स्टोरी-2' सिनेमा कधी आला आणि कधी गेला हे रसिकांना माहितीही पडलं नाही. मात्र रसिकांच्या लक्षात राहिली ती फक्त सिनेमातील सुरवीन चावला. त्यातही तिचा स्वीमिंग पूलमधील हा हॉट एंड सेक्सी बिकीनी अवतार.. हा अवतार पाहून रसिकही म्हणू लागले आज फिर तुमसे प्यार आया है. रब ने बना दी जोडी या सिनेमातून बी-टाऊनमध्ये एंट्री मारणारी ती साधी सरळ नायिका हीच का असा प्रश्न तुम्हाला पडेल. या ब्लॅक बिकीनी लूकमध्ये अनुष्का शर्मानं अनेकांना बोल्ड केलंय.बंगाली बेब्स बिपाशा बासूचा हॉट अंदाज रसिकांनी सिनेमातून कायम पाहिलाय. मात्र समुद्रामधील बिल्लो रानीचा हा हॉट बिकीनी अवतार किलरच म्हटलं तर वावगं ठरु नये.कंगणा राणौतनं आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवुडची क्वीन हे पद मिळवलंय. विविध भूमिकांमध्ये जीव ओतणा-या कंगणाचा हा बिकीनी अवतार तुम्ही कधी पाहिलाय ? हॉट ब्लॅक रंगाच्या बिकीनीत कंगणाची हॉट बॉडीही दिसतेय..सेक्स सिम्बॉल असा जिचा उल्लेख केला जातो ती म्हणजे मॉडेल पूनम पांडे. स्वतःला एक्स्पोझ करत फॅन्समध्ये आपले बोल्ड फोटो शेअर करणा-या पूनमचा हा बिकीनी अवतारही काही कमी बोल्ड नाही.मराठमोळ्या सई ताम्हणकरनं जेव्हा या बिकीनी अवतारात रुपेरी पडद्यावर एंट्री मारली तेव्हा रियलमध्येही सारेच म्हणू लागले जपून जपून जरा पुढे धोका आहे. कारण समोर होती हॉट बेब सई.सोफियानं बिग बॉसच्या घरात एंट्री मारुन स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तिथं तिनं वादही घातले. मात्र तिला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यामुळंच की काय प्रसिद्धीसाठी तिनं हा बिकीनी लूक तर दिला नाही ना ?