By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 11:38 IST
1 / 7कुब्रा सैत आज वाढदिवस साजरा करत आहे. सेक्रेड गेम्समधून आपला ठसा उमटवणारी कुब्रा अनेक हिट चित्रपटांचा भाग आहे. कुब्रा यांचा जन्म २७ जुलै १९८३ रोजी बंगळुरू येथे झाला. तिला कलाकार आणि राजकारणाची पार्श्वभूमी आहे.2 / 7 दुबईहून शिक्षण घेऊन परतलेली कुब्रा ही एक भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. कुब्राने मायक्रोसॉफ्टमध्ये मॅनेजर म्हणून करिअरची सुरुवात केली.3 / 7कुब्राने नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स'द्वारे आपली ओळख निर्माण केली आहे. या वेब सीरिजमध्ये तिने ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. त्यामुळे तिला जगभरात ओळख मिळाली. 4 / 7ही मालिका खूप लोकप्रिय होती, ज्यामुळे तिला २०१९ मध्ये एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी कुब्ब्रा सैत पोहोचले होती. याशिवाय कुब्रा सुलतान, रेडी आणि सिटी ऑफ लाईफ आणि गली बॉय सारख्या चित्रपटांमध्येही दिसली आहे.5 / 7कुब्राने २०१० मध्ये अभिनेत्री म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली. १३ वर्षांच्या कारकिर्दीत ती आतापर्यंत ८ चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये दिसली आहे.6 / 7नेटफ्लिक्स ओरिजनलची प्रचंड गाजलेली वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’मध्ये तिने तृतीयपंथियाची भूमिका साकारली. तिच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. ‘सेक्रेड गेम्स’मध्ये कुब्राने न्यूड सीन दिला होता. यावरही ती बोलली होती.7 / 7 ‘सेक्रेड गेम्स’मधील भूमिका साकारणे सोपे नव्हते. यातील न्यूड सीन साकारताना मी इतके नर्व्हस झाले होते की मला तो जमेना. अनुरागने मलाव्हिस्की दिली आणि त्यानंतर कुठे मी हा सीन दिला, असे तिने सांगितले होते.