Join us

'तारे जमीन पर'मधील छोट्या ईशानला आता ओळखणं झालंय कठीण, दिसतो खूपच हॅण्डसम; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 06:00 IST

1 / 9
आमिर खानचा 'तारे जमीन पर' हा लोकप्रिय चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल. या चित्रपटात आमिर खानसोबत दर्शील सफारी ईशानच्या भूमिकेत झळकला होता.
2 / 9
२००७ मध्ये आलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात दर्शील सफारीने त्याच्या दमदार अभिनयासाठी बरीच प्रशंसा मिळवली होती. चित्रपट रिलीज होऊन १५ वर्षे झाली आहेत आणि या वर्षांत दर्शील सफारीचा लूक पूर्णपणे बदलला आहे.
3 / 9
२५ वर्षीय दर्शील आता तरुण हँडसम माचो मॅन बनला आहे. दर्शील सफारीचा एक लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून लोक चकित झाले आहेत.
4 / 9
दर्शीलला आता ओळखणं कठीण झालं आहे. तो खूपच हॅण्डसम दिसतो.
5 / 9
लहान वयात दर्शील सफारीने राष्ट्रीय पुरस्कार मिळवून सर्वांनाच चकित केले.
6 / 9
दर्शीलचा लेटेस्ट लूक व्हायरल होताना दिसत आहे.
7 / 9
दर्शीलचा लूक बॉलिवूडच्या कोणत्याही चॉकलेटी हिरोपेक्षा कमी नाही. हा फोटो समोर आल्यानंतर लोकांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
8 / 9
यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, 'तुझ्याकडे पाहून अजूनही असे वाटते की तू तितकाच प्रतिभाशाली आहेस'.
9 / 9
तर दुसऱ्याने 'तुला पाहिल्यानंतर ओळखू शकलो नाही' असे लिहिले आहे. त्याच वेळी, एकाने त्याला प्रोफेसर ऑफ मनी हाइस्ट आणि निक जोनास यांचे मिश्रण म्हटले आहे.
टॅग्स :दर्शील सफारीआमिर खान