Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बॉलिवुड कलाकार कंजूस, कोणीच पार्ट्यांमध्ये...', तापसी पन्नूने केली सेलिब्रिटींची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 13:10 IST

1 / 8
अभिनेत्री तापसी पन्नू (Tapasee Pannu) नेहमी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. इंडस्ट्रीत आऊटसाईडर असलेल्या तापसीने टॅलेंटच्या जोरावर यश मिळवलं आहे. आऊटसाईडर असल्याने तिने अनेकदा आपल्या विधानांतून बॉलिवुडची पोलखोलही केली आहे.
2 / 8
नुकतेच तिने बॉलिवुड पार्ट्यांबाबात विधान केले. बॉलिवुडच्या पार्ट्यांबाबत तिने एक खुलासा केला आहे. बॉलिवुडच्या पार्ट्यामध्ये सर्व कलाकार रिकाम्या हातीच का जातात याविषयी तिने कलाकारांचीच पोलखोल केली आहे.
3 / 8
एका मुलाखतीत तापसी म्हणाली, 'फिल्म इंडस्ट्रीतील पार्ट्या कितीही ग्रॅंड का असेना सर्व कलाकार रिकाम्या हातीच जातात. कोणीच भेटवस्तू घेऊन जात नाही. मग कोणाचा वाढदिवस असो किंवा कशाचं सेलिब्रेशन असो.'
4 / 8
फिल्म इंडस्ट्रीतील लोक थोडे विचित्रच असतात. त्यांच्या पद्धती वेगळ्याच असतात.कोणीही एखाद्या कलाकाराच्या घरी बर्थडे किंवा दिवाळी पार्टीसाठी गेला तर कोणीच गिफ्ट घेऊन जात नाही.
5 / 8
तापसी म्हणाली, 'मी शाहरुखच्याही वाढदिवसाच्या पार्टीला गेले आहे. मात्र शाहरुखकडे तर सगळंच आहे त्याला काय गिफ्ट देणार असा मला प्रश्न पडला.त्याला एखादं पुस्तक जरी द्यायचं म्हणलं तरी ते त्याला आवडणार का. आणि जर त्याला नाही आवडलं तर तो पुढच्या वेळी आपल्याला पार्टीला बोलवणारच नाही.'
6 / 8
तापसीने शाहरुखशिवाय बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरी झालेल्या पार्टीबद्दलही खुलासा केला. ती म्हणाली, ' अमितजींच्या घरीही सर्व रिकाम्या हातीच जातात. माझ्या करिअरच्या सुरुवातीला पार्ट्यांमध्ये गिफ्ट घेऊन जाणारी मी एकटीच होते. मग एक दिवस मी देखील गिफ्ट घेऊन जाणे बंद केले.'
7 / 8
बॉलिवुड कलाकार खूपच कंजूस आहेत. या पार्ट्या अशाच असतात, आपल्याला पुन्हा पार्टीत बोलवतील की नाही असं मला वाटायचं शेवची मीही गिफ्ट(डब्बा) घेऊन जाणं बंद केलं असंही तापसी मिश्कीलपणे म्हणाली.
8 / 8
तापसी शाहरुखच्या आगामी 'डंकी' सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केला आहे.
टॅग्स :तापसी पन्नूशाहरुख खानअमिताभ बच्चनबॉलिवूड