Join us

'बागबान' सिनेमात हेमा मालिनी यांच्या जागी तब्बूला होती पहिली पसंती, पण या कारणामुळे तिने नाकारला सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 18:31 IST

1 / 7
बॉलिवूडमध्ये अनेकदा असे प्रसंग आले आहेत, जेव्हा मोठ्या अभिनेत्रींनी सुपरस्टार्ससोबत काम करण्यास नकार दिला आहे. असाच एक किस्सा त्यावेळी समोर आला जेव्हा प्रसिद्ध अभिनेत्री तब्बूने अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा चित्रपट नाकारला होता.
2 / 7
तब्बू ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
3 / 7
पण तुम्हाला माहिती आहे का की, या अभिनेत्रीने बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचा एक चित्रपट नाकारला होता.
4 / 7
२००३ साली आलेल्या अमिताभ बच्चन यांच्या हिट चित्रपट 'बागबान'ला तब्बूने नकार दिला होता.
5 / 7
'बागबान'च्या निर्मात्या रेणू चोप्रा यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, त्यांनी तब्बूला चित्रपटाची कथा ऐकवली होती. तब्बूला चित्रपटाची कथा खूप आवडली होती आणि ती कथा ऐकून ती रडली देखील होती.
6 / 7
मात्र, नंतर तब्बूला ४ मुलांच्या आईची भूमिका साकारायची नव्हती, याच कारणामुळे तिने ही भूमिका नाकारली होती.
7 / 7
या चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता आणि या चित्रपटाने ३० कोटी रुपयांची कमाई केली होती.
टॅग्स :तब्बू