Join us

यारों का यार...! सुशांतच्या मृत्यूच्या 4 दिवसानंतर जिवलग मित्राने शेअर केलेत जुने फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 14:23 IST

1 / 9
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर चार दिवसांनी त्याच्या जिवलग मित्राने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत.
2 / 9
पवित्र रिश्ता या मालिकेत सुशांतसोबत काम करणारा करणवीर मेहराने हे जुने फोटो पोस्ट केले आहेत.
3 / 9
सुशांत व करण एकमेकांचे खूप जवळचे मित्र होते.
4 / 9
सुशांतच्या अचानक जाण्याने करणला मोठा धक्का बसला आहे. सुशांतसोबत घालवलेला प्रत्येक क्षण त्याला आठवतो आहे.
5 / 9
हे सर्व फोटो एका पार्टीतील आहेत. यात सुशांत धम्माल मस्ती करताना दिसतो.
6 / 9
मित्रांसोबत मस्ती करताना सुशांत सगळे काही विसरायचा, हे फोटो पाहून दिसतेय.
7 / 9
मित्रांच्या सुखदु:खात सुशांतने नेहमी त्यांना मदत केली. फिल्म इंडस्ट्रीत मोजकेच पण पक्के मित्र त्याने बनवले होते.
8 / 9
एकेकाळी करणवीर मेहरा त्याच्या अडचणींमुळे वैतागला होता. त्यावेळी सुशांतने त्याला धीर दिला होता.
9 / 9
मित्रांना धीर देणा-या सुशांतचा स्वत:चाच धीर खचला, यावर अनेकांना विश्वास ठेवणे कठीण जातेय. सुशांतने गेल्या रविवारी गळफास लावून आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली.
टॅग्स :सुशांत सिंग रजपूत