मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 12:00 IST
1 / 8बॉलिवूड सेलिब्रिटींची अफेअर ही काही केल्या लपवता येत नाहीत. आता चर्चा रंगलीये ती सुनील शेट्टीचा लेक अहानच्या डेटिंग लाइफची. 2 / 8अहान शेट्टी हा एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ही अभिनेत्री मराठी असल्याचं बोललं जात आहे.3 / 8आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, अहान शेट्टी मराठी अभिनेत्री जिया शंकरला डेट करत आहे. पण, अहान आणि जिया दोघांनाही त्यांचं नातं सोशल करायचं नाही. 4 / 8त्यामुळेच दोघांनीही त्यांच्या नात्याची कबुली अद्याप दिलेली नाही. पण, जियाने अनेकदा तिचा बॉयफ्रेंड असल्याचं सांगितलं आहे.5 / 8पण, अद्याप जियाने ती कोणाला डेट करतेय याबाबत खुलासा केलेला नाही. पण, आता तिचं नाव अहान शेट्टीसोबत जोडलं जात आहे. 6 / 8त्यामुळे जिया सुनील शेट्टीची सून होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, अहान किंवा जियाने याबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाही. 7 / 8जियाने 'पिशाचीनी', 'काटेलाल अँड सन्स' या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर रितेश देशमुखच्या 'वेड'मध्ये ती दिसली होती. या सिनेमाने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. 8 / 8तर अहानने २०२१ मध्ये 'तडप' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता तो 'बॉर्डर २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.