By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 12:08 IST
1 / 12कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला लव्ह लेटर लिहिलं आहे. जॅकलिनच्या वाढदिवशी लिहिलेल्या या लव्ह लेटरमध्ये सुकेशने आपलं मन मोकळं केलं आहे. 2 / 12सुकेश चंद्रशेखरने पत्र हिंदीत लिहिलं असून त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेक चुका असलेल्या या पत्रात सुकेश रोमँटिक होताना दिसत आहे. याआधी देखील त्याने अनेकदा पत्र लिहिलं आहे. 3 / 12सुकेशने आपल्या लव्ह लेटरमध्ये लिहिलं की, 'माझ्या प्रिय जगातील सर्वात सुंदर बोम्मा जॅकी (जॅकलीन फर्नांडिस)… झाडावर हजारो फुलं फुलतात पण त्यातील एक फुल खास असतं… आयुष्यात हजारो आठवणी असतात पण त्यातली एक खास असते, जी हृदयाला स्पर्श करते, प्रेमात वेडं करते.'4 / 12'आज मी ईश्वराकडे काहीतरी मागितलं आहे, त्यांच्यापुढे माझं डोकं टेकवलं आहे. जगातील सर्व सुख मी तुझ्या पायाशी आणून ठेवेन. तुझं सर्व दु:ख मी घेईन, तुझं प्रत्येक स्वप्न, प्रत्येक इच्छा पूर्ण होवो…'5 / 12'बार बार दिन ये आए… बार बार दिल ये गये.. तुम जिओ हजारों साल… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. वाढदिवसाच्या शुभेच्छा.. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मेरी जान' 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला याआधीही पत्र लिहिलं आहे. 6 / 12या वर्षात सुकेशने जवळपास तीन वेळा आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. या वर्षी मार्चमध्ये त्याच्या वाढदिवशी सुकेशने जॅकलिनला एक पत्र लिहून मी तुला खूप मिस करत असल्याचं म्हटलं होतं. 7 / 12एप्रिलमध्ये यानंतर सुकेशचे जॅकलिनसाठी लिहिलेले पत्रही समोर आले होते. त्यानंतर मे महिन्यातही त्याने मनातील भावना पत्र लिहून व्यक्त केल्या होत्या. सुकेश चंद्रशेखर जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा करत आहेत. 8 / 12सुकेशचे नाव अभिनेत्री नोरा फतेहीसोबतही जोडले गेले होते. सुकेशशी संबंधित प्रकरणात नोरा आणि जॅकलिनचीही नावे पुढे आली होती. सुकेश आणि जॅकलिनच्या काही फोटो याआधी समोर आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 9 / 1210 / 1211 / 1212 / 12