1 / 9लावा का धावा- आज 5 मे रोजी नेटफ्लिक्सवर ‘लावा का धावा’ हा शो रिलीज झाला. हा शो नेटफ्लिकच्याच ‘फ्लोर इज लावा’ या शोचे हिंदी रुपांतर आहे. या शोमध्ये अभिनेता जावेद जाफरी त्याच्या खास ढंगात मजेदार कॉमेंट्री करत प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करताना दिसणार आहे.2 / 9रामयुग - कुणाल कोहली दिग्दर्शित ही वेब सीरिज रामयुग उद्या 6 मे पासून एमएक्स प्लेअरवर रिलीज होतेय. यामध्ये रामाची कथा एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे.3 / 9माइलस्टोन - हा सिनेमा एका ट्रक ड्रायव्हरच्या कथेवर बेतलेला आहे. आइवन अय्यरने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात सुविंदर विक्की आणि लक्षवीर सरन मुख्य भूमिकेत आहे. 7 मेला नेटफ्लिक्सवर हा सिनेमा रिलीज होतोय.4 / 9फोटो प्रेम - 7 मे रोजी अॅमेझॉन प्राईमवर फोटोप्रेम हा मराठी सिनेमा प्रदर्शित होतोय. या सिनेमात नीना कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत.5 / 9हम भी अकेले तुम भी अकेले- बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान आणि अंशुमन झा यांच्या अभिनयाने सजलेला ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ हा सिनेमा येत्या 9 मे रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होतोय. एका रोड ट्रिपवर आधारित या सिनेमात जरीन एका लेस्बियनची तर अंशुमन एक गे व्यक्तिरेखा साकारणार आहेत. 6 / 9राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई- हा भाईजानचा सिनेमा येत्या 13 मे रोजी झी प्लेक्सवर रिलीज होतोय/ डिजिटल प्लॅटफॉर्म्ससह थिएटरमध्येही हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. सलमानसोबत या सिनेमात दिशा पटानी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुडा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिनेमाचा ट्रेलर रीलिज झाला असून प्रेक्षकानी त्याला पसंती दर्शवली आहे.7 / 9अल्मा मॅटर: इनसाईड द आयआयटी ड्रीम -आयआयटी खरगपूरच्या कॅम्पसमध्ये घडणारी ही एक डॉक्युमेंट्री आहे. कॅम्पसच्या आत घडणारी गोष्ट यात पाहायला मिळेल. आयआयटीसाठी देशातला हा सर्वोत्तम कॅम्पस मानला जातो. बिस्वा या संस्थेतल्या विद्याथ्यार्ची कहाणी प्रेक्षकांना दाखवणार आहे. नेटफ्लिक्सवर 14 मे रोजी ही डॉक्युमेंट्री पाहता येणार आहे.8 / 9वंडर वुमन 1984 - वंडर वुमन 1984 पहिल्या सुपरहिरोची फ्रेंचाइजी 16 डिसेंबर 2020 मध्ये रिलीज झाली होती. आता हाच सिनेमा येत्या 15 मे रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज होत आहे.9 / 9सरदार का ग्रँडसन- अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंग यांचा सरदार का ग्रँडसन हा कॉमेडी ड्रामा असलेला सिनेमा नेटफ्लिक्सवर 18 मे रोजी रिलीज होत आहे. आपल्या आजीसाठी एक नातू त्याच्या सगळ्या कुटुंबाला कसा पाकिस्तानातून भारतात घेऊन येतो, ही गोष्ट या सिनेमात पाहायला मिळेल. सिनेमात अर्जुन आणि रकुलशिवाय जॉन अब्राहम आणि अदिती राव हैदरी हे दोघेही आहेत.