PHOTOS : साऊथ स्टार किच्चा सुदीपची पत्नी दिसते इतकी सुंदर, फिल्मी आहे मॅरिड लाईफ!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 12:28 IST
1 / 10साऊथचा सुपरस्टार किच्चा सुदीप सध्या ‘विक्रांत रोना’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा पॅन इंडिया सिनेमा लवकरच रिलीज होतोय. पण आज आम्ही किच्चा सुदीपच्या चित्रपटाबद्दल नाही तर त्याच्या पर्सनल लाईफबद्दल सांगणार आहोत.2 / 10होय, किच्चा सुदीपची मॅरिड लाईफ एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. आधी प्रेम, मग लग्न, मग घटस्फोटापर्यंत प्रकरण जाणं असं सगळं त्याच्या आयुष्यात घडलं. पण म्हणतात ना, अंत भला तो सब भला... तसंच आज सगळं काही सुरळीत झालं.3 / 10किच्चा 2000 साली एका मुलीच्या प्रेमात पडला. तिचं नाव प्रिया राधाकृष्णा. 2000 साली बेंगळुरूमध्ये दोघांची पहिली भेट झाली होती आणि दोघे प्रेमात पडले.4 / 10ही लव्हस्टोरी वर्षभर चालली आणि वर्षभरानंतर 2001 साली किच्चा व प्रियाने लग्नगाठ बांधली. लग्नाआधी प्रियाने एअरलाईन कंपनी व बँकेत काम केलं होतं. लग्नानंतर दोघांना एक मुलगी झाली.5 / 10लग्नानंतरची काही वर्ष आनंदात गेली. पण अचानक किच्चा व प्रियाच्या लग्नात भूकंप आला. होय, वैवाहिक आयुष्यातील कलह इतका वाढला की 2015 साली दोघं एकमेकांपासूप विभक्त झालेत.6 / 10केवळ विभक्त नाही तर दोघांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्जही केला. मग घटस्फोट झाला का? नाही..., कारण खरी कहाणी इथून पुढे सुरू झाली.7 / 10घटस्फोटाचा अर्ज करण्यााअधी चार वर्ष किच्चा व प्रिया एकमेकांपासून वेगळे राहत होते. अर्थात मुलीसाठी दोघं एकत्र यायचे. किच्चा व प्रियाच्या वैवाहिक आयुष्यात वाद सुरू असल्याचं दोघांनीही कुणालाच कळू दिलं नव्हतं.8 / 10सुदीप मुलीची कस्टडी प्रियाला द्यायला तयार होता. घटस्फोट झाला तर किच्चाला प्रियाला 19 कोटी रूपये द्यावे लागले असते, अशी चर्चा त्यावेळी होती. सुदैवाने तशी वेळ आलीच नाही.9 / 10होय, किच्चा व प्रियाने आपल्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला. मुलीसाठी दोघांनीही मतभेद विसरून एकत्र येण्याचं ठरवलं आणि एक लग्न, एक संसार मोडता मोडता वाचला.10 / 10आता किच्चा व त्याची पत्नी गुण्यागोविंदाने नांदत आहेत. दोघंही आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत.