४०व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार सोनम कपूर, हटके मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 11:37 IST
1 / 7बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर पुन्हा गरोदर आहे. सोनम ४०व्या वर्षी तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. काही दिवसांपूर्वीच सोनमने ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. 2 / 7सोनम कपूरने आता खास अंदाजात आणि हटके पद्धतीने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. 3 / 7सोनमने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यावर तिने भरजरी असा नेकलेस घातला आहे. 4 / 7केसांची वेणी घालत हलकासा मेकअर सोनमने केल्याचं फोटोत दिसत आहे. 5 / 7या फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो स्पष्ट दिसत आहे. सोनमने तिचा बेबी बंपही फ्लॉन्ट केला आहे. 6 / 7'दिल बदलता नहीं…बस औरों के लिए धड़कने लगता है', असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. 7 / 7सोनमने बिजनेसमॅन आनंद अहुजाशी लग्न केलं आहे. २०२२ मध्ये तिने पहिल्या मुलाला जन्म दिला. त्याचं नाव वायू ठेवलं आहे. आता दुसऱ्या बाळाच्या आगमनासाठी सोनम सज्ज झाली आहे.