हे बिग बजेट चित्रपट ठरले बॉक्स ऑफिसवर हिटः
बरेली की बर्फी
आयुषमान खुराना, राजकुमार राव आणि क्रिती सॅनन यांची मुख्य भूमिका असलेला बरेली की बर्फी हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळजवळ चार-पाच आठवडे झाले आहेत. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अजूनही खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शुभमंगल सावधान
बादशहो आणि शुभ मंगल सावधान हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. अजय देवगणच्या बादशहोने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. बादशहोला टक्कर देत शुभमंगल सावधानने देखील ३९.१८ करोड मिळवले.
लिपस्टिक अंडर माय बुरखा
लिपस्टिक अंडर माय बुरखा हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी हा चित्रपट चांगलाच वादात अडकला होता. सेन्सॉरच्या कात्रीत हा चित्रपट सापडूनही या चित्रपटाने १८ कोटीहून अधिक पैसे कमावले.
हिंदी मीडियम
हिंदी मीडियम या चित्रपटात प्रेक्षकांना इरफान खानचा अभिनय प्रचंड आवडला होता. या चित्रपटाचे बजेट खूपच कमी होते. पण तरीही या चित्रपटाने ६९ करोड कमावले.
टॉयलेट एक प्रेम कथा
अक्षय कुमारच्या टॉयलेट प्रेम कथाचे बजेट केवळ १८ करोड होते. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १३३ करोडहून अधिक कमाई केली आहे.
Also Read : भूमी पेडणेकर म्हणते, लग्नाअगोदर सेक्स करण्यात गैरच काय?, असं तर सगळेच करतात!