By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 16:37 IST
1 / 9इंदौरच्या पलक मुच्छलने बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी गायली आहेत. सलमान खानच्या चित्रपटांसाठी देखील ती गायली आहे. 2 / 9पलक मुच्छलने दैनिक भास्करला सांगितलं की, 'दिल से दिल तक' या मिशनच्या माध्यमातून ३४७३ मुलांची हार्ट सर्जरी केली आहे.3 / 9याच कारणामुळे पलकचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील आहे. 4 / 9पलक म्हणाली की, ती सात वर्षांची होती तेव्हाच तिने लहान मुलांच्या सर्जरीची जबाबदारी घेतली. 5 / 9एका मुलासाठी तिने परफॉर्म केलं. त्यामुळे ५५ हजार गोळा झाले. पण डॉक्टरांनी फ्रीमध्ये सर्जरी केली. 6 / 9पलक शोज करते आणि जे पैसे मिळतात. त्यातून गरजू मुलांची सर्जरी केली जाते. 7 / 9'मी आधी ३ तास गायची तेव्हा एका मुलाचा जीव वाचवू शकत होती. पण आज एकाच शोमधून १०-१२ मुलांचा जीव वाचतो.'8 / 9'जेव्हा कोणत्याही मुलाची सर्जरी असते तेव्हा मी OT मध्येच असते आणि मुलांसाठी प्रार्थना करते' असं पलकने म्हटलं आहे. 9 / 9