Join us

'वडापाव'साठी शिल्पा शेट्टीनं डाएटला ठोकला राम-राम, शेअर केले मजेशीर फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:33 IST

1 / 8
बॉलिवूडची फिटनेस क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच आरोग्यदायी जीवनशैली आणि डाएटमुळे चर्चेत असते.
2 / 8
पण, नुकतेच तिने तिच्या डाएटला तात्पुरता ब्रेक देत, तिच्या आवडत्या पदार्थाचा म्हणजेच वडापावचा आनंद घेतला.
3 / 8
शिल्पाने वडापाव खातानाचे काही मजेशीर फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, तिचे कॅप्शन सध्या चर्चेचा विषय बनले आहे.
4 / 8
वडापाव एन्जॉय करतानाचा फोटो शेअर करत शिल्पाने स्वतःला 'Forever #BatataVada girl' असं म्हटलं आहे.
5 / 8
पारंपरिक गुलाबी रंगाच्या पोशाखात असलेली शिल्पा तिच्या कारमध्ये बसून गरमागरम वडापाव खाताना दिसत आहे.
6 / 8
तिच्या चेहऱ्यावरील आनंद तिचं वडापाववरील प्रेम स्पष्टपणे दर्शवतंय. तिच्या या पोस्टवर मजेदार कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
7 / 8
शिल्पा शेट्टी ही नेहमीच सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. कामाबद्दल ती चाहत्यांना अपडेट देत असते.
8 / 8
शिल्पा शेट्टीचा 'केडी-द डेव्हिल' हा सिनेमा २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शिल्पा शेट्टी, संजय दत्त, नोरा फतेही, विजय सेतुपथी, अमजाद कुरेशी अशी स्टारकास्ट आहे.
टॅग्स :शिल्पा शेट्टीबॉलिवूडसेलिब्रिटी