Join us

पहिल्याच सिनेमातून झाली स्टार, लग्नानंतर रुपेरी पडद्यावरुन झाली गायब, अनुष्का शर्माची नेटवर्थ पाहून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 17:26 IST

1 / 9
अनुष्का शर्मा १ मे रोजी तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. अनुष्का ही सिनेइंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. मात्र सध्या ती बॉलिवूडपासून दुरावली आहे.
2 / 9
अभिनेत्री अनुष्का शर्मा आज इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध नाव आहे. तिने चित्रपटांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. मात्र ही ओळख आणि प्रसिद्धी मिळवण्यापूर्वी तिला खूप संघर्ष करावा लागला.
3 / 9
अनुष्का शर्माला वयाच्या १५ व्या वर्षी नकाराचा सामना करावा लागला. खूप संघर्षानंतर अनुष्काने शाहरुख खानसोबत काम केले.
4 / 9
तिने २००८ मध्ये 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटात काम केले. हा चित्रपट हिट झाला. अनुष्का तिच्या पहिल्याच चित्रपटातून स्टार बनली.
5 / 9
यानंतर अनुष्का 'बदमाश कंपनी' या चित्रपटात दिसली. तिचा 'बँड बाजा बारात' हा चित्रपटही चर्चेत आला.
6 / 9
अनुष्का शर्माने पटियाला हाऊस, लेडीज व्हर्सेस रिकी बहल, जब तक है जान, मटरू की बिजली का मंडोला, पीके, एनएच १०, बॉम्बे वेल्वेट, दिल धडकने दो, सुलतान, ए दिल है मुश्किल, फिल्लौरी, जब हॅरी मेट सेजल, परी, संजू, सुई धागा यासारख्या चित्रपटात काम केले.
7 / 9
२०१८ मध्ये ती झिरो चित्रपटात दिसली. हा चित्रपट फ्लॉप झाला. या चित्रपटात कतरिना कैफ आणि शाहरुख देखील झळकले.
8 / 9
तेव्हापासून अनुष्काने चित्रपटांपासून स्वतःला दूर केले आहे. तिने बुलबुलची निर्मिती केली आणि काला चित्रपटात एक छोटी भूमिका केली. ती चकदा एक्सप्रेसमध्ये दिसणार आहे.
9 / 9
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अनुष्काच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, अनुष्का २५५ कोटींची मालकीण आहे. ती फॅशन लेबल्स, गुंतवणूक, ब्रँड एंडोर्समेंटद्वारे कमाई करते.
टॅग्स :अनुष्का शर्मा