Join us

शाहरुख खानचा 'तो' किस्सा; भोगावा लागला होता तुरुंगवास, 'किंग खान'सोबत काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 14:02 IST

1 / 10
बॉलिवूडचा बादशाह, किंग ऑफ रोमान्स... ही सर्व विशेषणं ज्याच्या नावापुढे लागतात, त्या शाहरुख खानचा आजचा प्रवास सोपा नव्हता. यशाच्या शिखरावर पोहोचण्याआधी त्याला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला.
2 / 10
विशेषतः त्याच्या करिअरच्या सुरुवातीला जेव्हा त्याची लोकप्रियता वाढत होती, तेव्हा त्याच्याबद्दल अनेक चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या.
3 / 10
अशाच एका घटनेमुळे तो इतका संतप्त झाला की त्याला तुरुंगामध्ये जावं लागलं होतं. ही घटना शाहरुखच्या लग्नानंतरची आहे.
4 / 10
एका लोकप्रिय मासिकाने एका अभिनेत्रीसोबत त्याच्या अफेअरची खोटी बातमी छापली. हे वाचून शाहरुख खूप अस्वस्थ झाला, कारण पत्नी गौरीला सुरुवातीपासूनच त्याच्या अभिनयाबद्दल आणि चित्रपटाच्या जगाबद्दल अनेक शंका होत्या.
5 / 10
शाहरुखने थेट त्या पत्रकाराला फोन केला आणि विचारले, 'तुम्ही हे असं का लिहिलंत?' त्यावर पत्रकारानं म्हटलं, 'शाहरुख, हा एक विनोद आहे'. ते उत्तर ऐकून शाहरुखचा पारा आणखी चढला. तो म्हणाला, 'हा विनोद नाहीये. तुला माझा हसण्याचा आवाज ऐकू येतोय का?'.
6 / 10
यानंतर गोष्टी हाताबाहेर गेल्या. संतापलेला शाहरुख थेट त्या मासिकाच्या ऑफिसमध्ये पोहोचला. त्याने तिथे खूप गोंधळ घातला, लोकांसोबत भांडण केले आणि मारामारी केली. 'नेटफ्लिक्स'वरील डेव्हिड लेटरमॅनच्या टॉक शोमध्ये शाहरुख खानबद्दल खुलासा केला होता.
7 / 10
शाहरुखनं सांगितलं होतं की, या घटनेनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. जेलमध्ये गेल्यावर शाहरुखला एक फोन करण्याची परवानगी मिळाली.
8 / 10
वकिलाला किंवा पत्नीला फोन करण्याऐवजी त्याने पुन्हा त्याच पत्रकाराला फोन केला. तो म्हणाला, 'आता मी तुरुंगातही गेलो आहे. पण, घाबरलो नाही, पण तू घाबरायला हवं, मी बाहेर आल्यावर तुला मारेन'.
9 / 10
शाहरुखने हा किस्सा सांगितल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आज शांत आणि संयमी वाटणारा शाहरुख एकेकाळी इतका रागीट होता, हे अनेकांना माहित नव्हते.
10 / 10
THiNK २०१२ ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान शाहरुखने त्याचे जामिनावर सुटण्याचे श्रेय ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना दिले. नाना पाटेकर यांनी त्याला तुरुंगातून बाहेर काढले होते.
टॅग्स :शाहरुख खाननाना पाटेकर