खरं तर जेव्हा मॉम करिना तैमूरला घेऊन दिल्लीला जात होती, तेव्हा तैमूरचा मुड फारसा चांगला नव्हता. त्यामुळे तो रडत रडतच दिल्लीला रवाना झाला. मात्र दिल्लीतून मुंबईत परताच तैमूरच्या चेहºयावरील हास्य बघण्यासारखे होते. मॉम करिनाच्या कडेवर तैमूर खूपच खूश दिसत होता. हाफ फॉर्मलमध्ये करिना, तर ब्लू चेक शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये तैमूर बघावयास मिळाला. दरम्यान, करिनाने दिल्लीत केलेल्या ‘वीरे दी वेडिंग’च्या शूटिंगचा एक व्हिडीओ सोशल साइट पोस्ट केला आहे.
दरम्यान, करिनाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटिझन्सकडून त्यास चांगली पसंतीही मिळत आहे. व्हिडीओमध्ये करिना आपल्या लाडक्या तैमूरविषयी सांगत आहे की, लोकांना जाणून घ्यायचे आहे की, तैमूर अखेर कुठे आहे? पुन्हा मॉम करिना म्हणताना दिसते की, ‘तैमूरला सेटवर बॅन आहे.’ असो, तैमूरचे हे हसतमुख फोटो त्याच्या इतर फोटोंप्रमाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.