Join us

SEE PICS : ​हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस उर्वशी रौतेला कॉलेज दिवसात दिसायची अशी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 15:22 IST

उर्वशी रौतेला, बॉलिवूडची एक हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस अभिनेत्री. याच हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस उर्वशीचे कॉलेज दिवसाचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी ...

उर्वशी रौतेला, बॉलिवूडची एक हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस अभिनेत्री. याच हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस उर्वशीचे कॉलेज दिवसाचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. उर्वशी आज एक अभिनेत्री असती तरी शाळेत असताना स्पोर्ट गर्ल अशी तिची ओळख होती. कॉलेजच्या दिवसात ती बॉस्केटबॉलची नॅशनल चॅम्पियन राहून चुकली आहे. २०११ मध्ये मॉडेलिंगद्वारे आपल्या करिअरची सुरुवात करणाºया उर्वशीचा जन्म नैनीतालमध्ये झाला. शाळेच्या दिवसांतच उर्वशीने मॉडेलिंगची ुसुरूवात केली होती. वयाच्या उण्यापुºया १७ व्या वर्षी उर्वशीने मिस युनिव्हर्सचा ताज आपल्या नावावर केला.२०११ मध्ये मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब तिने जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’,‘सनम रे’ अशा चित्रपटात ती दिसली. यानंतर ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ हा चित्रपट तिच्या झोळीत पडला.उर्वशीने फार कमी वयात मॉडेलिंग सुरु केले. त्यामुळे अगदी लहानपणापासून ती आपल्या ब्युटी व फिटनेसबाबत कमालीची जागृत आहे. सौंदर्यासाठी मी काहीही वेगळे करत नाही.मी उत्तराखंडची राहणारी आहे आणि हेच माझ्या सौंदर्याचे खरे रहस्य आहे,असे ती सांगते. रोज वॉकिंग आणि जॉगिंग हे उर्वशीच्या फिटनेसचे रहस्य आहे. या दोन गोष्टी केल्याशिवाय तिची सकाळ-संध्याकाळ होत नाही. याशिवाय योग, मेडिटेशन या गोष्टीही ती न चुकता करते. उर्वशीला डान्स प्रचंड आवडतो. टोण्ड बॉडीसाठी ती बॅले आणि झुम्बा डान्स करते.