आरती केल्यानंतर दोघेही बराच वेळ विघ्नहर्तासमोर हात जोडून उभे होते. संजूबाबा आणि त्याची पत्नी यावेळी ट्रेडिशनल आउटफिटमध्ये बघावयास मिळाले. आरती म्हणताना संजूबाबा खूपच लिन झाला होता. आयोजकांनीही दोघांचे जल्लोषात स्वागत केले. संजूबाबा सध्या त्याच्या आगामी ‘भूमी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. शिक्षा भोगून कारागृहात बाहेर आल्यानंतर संजूबाबा ‘भूमी’मधून कमबॅक करीत आहे. चित्रपट मुलगी आणि वडिलांच्या नात्यावर आधारित आहे. त्यामुळे हा एक संवेदनशिल चित्रपट आहे. चित्रपटात संजूबाबाने वडिलांची तर आदिती राव हैदरी हिने मुलीची भूमिका साकारली आहे.
गेल्या बुधवारी या चित्रपटातील पहिले रोमॅण्टिक गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याला राहत फतेह अली खान यांनी गायिले असून, गाण्यात आदिती आणि सिद्धांतची केमेस्ट्री बघावयास मिळते. गाण्याला सचिन जिगर याने कंपोज केले आहे. गाण्याचे पिक्चरायजेशन खूपच सुंदर आहे. गाण्याला आग्रातील ताजमहल परिसरात शूट करण्यात आले आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे.
दरम्यान, ‘भूमी’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, त्यामध्ये संजूबाबा दमदार भूमिकेत बघावयास मिळतो. वास्तविक ट्रेलरची सुरवातच संजूबाबाच्या गणपती आरतीने होते. हा चित्रपट येत्या २२ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.