1 / 7'पार्टनर' सिनेमा सर्वांना आठवत असेलच. सिनेमातील सलमान खान आणि गोविंदा या दोन अभिनेत्यांची जुगलबंदी चांगलीच गाजली. या सिनेमात सलमानला त्रास देणाऱ्या लहान मुलाने चांगलाच भाव खाल्ला होता. 2 / 7'पार्टनर' सिनेमातील या बालकलाकाराने त्याच्या मस्तीखोर अभिनयाने सर्वांचं मन जिंकलं. याचं नाव अली हाजी. अली आता अभिनय सोडून वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे3 / 7अलीने बालकलाकार म्हणून अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलंय. आमिर खानसोबत फना, अमिताभ बच्चन यांच्यासह फॅमिली अशा सिनेमात अली झळकला आहे.4 / 7याशिवाय अलीने मोठं झाल्यावर हृतिक रोशनच्या सुपर ३० सिनेमातही काम केलंय. अली आता मात्र अभिनय सोडून एका वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे5 / 7अली आता क्लीन स्लेट स्टूडियो या नावाने स्वतःची प्रॉडक्शन संस्था चालवत आहे. याशिवाय तो विविध प्रोजेक्ट्ससाठी लेखन आणि दिग्दर्शनाची धुराही सांभाळत आहे.6 / 7अलीचे सोशल मीडियावर १९ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. अली आजही सलमान खानच्या संपर्कात असून तो करिअरच्या बाबतीत भाईजानकडून टिप्स घेत असतो7 / 7अलीचं बदलतं रुप बघून हाच पार्टनरमध्ये सलमानला त्रास देणारा मस्तीखोर मुलगा आहे, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. अली सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे.