चाकू हल्ल्यामुळे शेड्युल बिघडलं, सैफ अली खानच्या आगामी ६ सिनेमांवर होणार परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 16:31 IST
1 / 7सैफ अली खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. सैफवर आज (१६ जानेवारी) एका चोराने चाकू हल्ला केला. त्यामुळे सैफ चांगलाच जखमी झाला 2 / 7सैफ अली खानवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून तो लवकरात लवकर बरा होईल अशी सर्वांना आशा आहे. सैफवर अचानक या घटनेचा सामना करावा लागल्याने त्याच्या आगामी सिनेमांचं शूटिंग बिघडलंय.3 / 7सैफ सध्या 'ज्वेल थीफ: द रेड सन' या सिनेमाचं सिद्धार्थ आनंदसोबत शूटिंग करत होता. याशिवाय सैफचे आगामी काही सिनेमेही चर्चेत आहेत4 / 7सैफ सध्या 'रेस ४', याशिवाय साउथ सुपरस्टार प्रभाससोबत संदीप रेड्डी वांगाच्या आगामी 'स्पिरीट' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता.5 / 7याशिवाय गेल्या वर्षी सैफचा गाजलेला सिनेमा 'देवरा'चा पुढच्या भागाची सैफ तयारी करत होता. 'देवरा पार्ट २'मध्ये सैफसोबत पुन्हा एकदा ज्यु.एनटीआर दिसणार आहे6 / 7याशिवाय 'क्लिक शंकर' आणि 'शूटआऊट अॅट भायखळा' या अंडरवर्ल्डवर आधारीत सिनेमांच्या शूटिंगची सैफ तयारी करत होता.7 / 7सैफसोबत अचानक ही घटना घडल्याने पुढचे काही महिने तरी सैफ आराम करणार आहे. याशिवाय हल्ला झाल्याने त्याच्या सुरक्षेसाठी कडक पहारा असेल. म्हणूनच सैफच्या आगामी सिनेमांचं शूटिंग थांबलंय