Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफ करीनामध्ये इतक्या वर्षाचे अंतर, तरीही दोघांमध्ये आहे चांगली केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 15:26 IST

1 / 10
वयाने सैफ करीनापेक्षा १० वर्षांनी मोठा आहे. मात्र एकत्र लग्नाचा निर्णय घेतला त्यावेळी करीनाने सैफसमोर एक अट ठेवली होती. सैफ नवाबच्या घराण्यातून होता.
2 / 10
सैफशी लग्न करुन करीना बेगम बनणार होती. त्यामुळे पैशाची तिला काही कमी नव्हती. मात्र लग्नानंतरही बॉलीवुडमध्ये काम करत राहणार अशी अट तिने सैफपुढे ठेवली. सैफने याला लगेचच होकार दिला आणि दोघे रेशीमगाठीत अडकले.
3 / 10
दोघांचे धर्म वेगवेगळे होते. मात्र दोघांच्या कुटुंबीयांनी मोठ्या आनंदात दोघांचे लग्न लावून दिलं. त्यांचे लग्न धुमधडाक्यात व्हावं अशी खान आणि कपूर कुटुंबीयांची इच्छा होती.
4 / 10
हे लग्न साधेपणाने पार पडावं अशी सैफिनाची इच्छा होती. त्यामुळे लग्न धुमधडाक्यात करण्याचे दोन्ही कुटुंबीयांनी ठरवलं तर पळून जाऊन लग्न करण्याचा इशारा सैफिनाने दिला होता.
5 / 10
दोघांच्या या धमकीनंतर दोघांचं लग्न साधेपणाने संपन्न झाले. दोघांनी कोर्टात लग्न केले आणि काही मोजक्या मंडळींनाच लग्नाचे निमंत्रण देण्यात आलं होतं.
6 / 10
हीच होती दोघांच्या लग्नाची विचित्र अट. आता लग्नानंतर बेगम करीना एका मुलाची आई असून बॉलीवुडमध्येही ती काम करते आहे.यांत तिला सैफचा पूर्णपणे पाठिंबा आहे.
7 / 10
. दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात.
8 / 10
त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात.
9 / 10
सैफ आणि करिना चित्रपटसृष्टीतील एक गोड दाम्पत्य म्हणून ओळखलं जातं.
10 / 10
दिवसेंदिवस दोघांमधील नाते आणखीनच घट्ट होत असून दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे.
टॅग्स :सैफ अली खान करिना कपूर